karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेेस राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार

SHARE:

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेेस राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार : कर्मवीर भाऊराव पाटील नागरी सहकारी पतसंस्था यांना महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन पुणे यांचा विभागातून 1 हजार कोटीवरील संस्था ठेव गटासाठी दिला जाणारा राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार 2025 देवून सन्मानित करण्यात करण्यात आले.
कर्नाटकातील गोकर्ण महाबळेश्वर येथे माजी सहकार आयुक्त व निबंधक श्रीकृष्ण वाडेकर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयते व महाराष्ट्र आणि कर्नाटक सहकार क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

karamvir patsanshta news : कर्मवीर पतसंस्थेेस राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्कार

1 हजार कोटी ठेवी उद्दिष्ट पूर्ण केल्याने गौरव

पुरस्काराच्या निकषामध्ये संस्थेचे अर्थकारण, वापरातील तंत्रज्ञान, समाजकारण, ग्राहकांना दिलेल्या आधुनिक सेवा, संस्थेची आर्थिक प्रगती ग्राहकसेवा व समाजसेवा व्यवस्थापन सहकारासाठीचे योगदान या मापदंडावर आधारीत संस्थेने सादर केलेल्या प्रस्तावाची स्वतंत्र निवड समितीने छाननी केल्यानंतर या पुरस्कारासाठी संस्थेची निवड करण्यात आली. या पुरस्काराचे श्रेय संस्थेचे सभासद ठेवीदार, कर्जदार, सेवक, यांच्या सांघिक कार्याचे असल्यामुळे या सर्वांनी समाधान व्यक्त केले.

संस्थेच्या ठेवी 1208 कोटी असून 1001 कोटीचे कर्ज वाटप केले आहे. संस्थेची गुंतवणुक 318 कोटी आहे. संस्थेचा स्वनिधी 148 कोटी आहे. सभासद संख्या 69 हजार आहे. मार्च 2025 अखेर संस्थेस 26 कोटी 64 लाखाचा नफा झाला आहे.

यावेळी संस्थेच्या चेअरमन भारती चोपडे, उपाध्यक्ष अ‍ॅड. एस.पी. मगदूम संचालक रावसाहेब पाटील, डॉ. अशोक सकळे, डॉ. रमेश ढबू . ओ. के. चौगुल, वसंतराव नवले डॉ. एस.बी. पाटील, डॉ. चेतन पाटील, तज्ञ संचालक डॉ. नरेंद्र खाडे, लालासो थोटे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल मगदूम यांच्यासह प्रतिनिधी उपस्थित होते. हा पुरस्कार स्वीकारणेसाठी संस्थेच्यावतीने अधिकारी संजय सासणे, सुकांत चौगुले व विभागीय अधिकारी अभिजीत खोत हे कार्यस्थळी उपस्थित होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *