kasbe digraj news : कसबे डिग्रज मतदारसंघात सौ. पूजा पाटील यांची उमेदवारी चर्चेत भाजप नेत्या जयश्री पाटील धर्मसंकटात

SHARE:

kasbe digraj news : कसबे डिग्रज मतदारसंघात सौ. पूजा पाटील यांची उमेदवारी चर्चेत भाजप नेत्या जयश्री पाटील धर्मसंकटात: मिरज तालुक्यातील कसबे डिग्रज जिल्हा परिषद मतदारसंघ सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. खासदार विशाल पाटील यांच्या पत्नी सौ. पूजा पाटील यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळणार, अशी जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगली आहे. पद्माळे या गावच्या स्थानीक असल्यामुळे त्यांच्या नावाला ग्रामपातळीवरही चांगला पाठिंबा मिळत आहे.

kasbe digraj news : कसबे डिग्रज मतदारसंघात सौ. पूजा पाटील यांची उमेदवारी चर्चेत भाजप नेत्या जयश्री पाटील धर्मसंकटात

या मतदारसंघात कसबे डिग्रज, नांद्रे, पद्माळे आणि मौजे डिग्रज ही चार गावे येतात. गेली कित्येक वर्षे या संपूर्ण भागाने दादा घराण्यावर विश्वास ठेवत सातत्याने साथ दिली आहे. आजवर येथे निवडून आलेले बहुतेक उमेदवार दादांच्या विचारांचे वारसदार होते.

या पार्श्वभूमीवर सौ. पूजा पाटील यांचे नाव चर्चेत येणे म्हणजेच दादा घराण्यातील अंतर्गत समीकरणांचे नवे परिमाण स्पष्ट होण्याची नांदी मानली जात आहे. मात्र, या सार्‍या घडामोडींमुळे सर्वात अडचणीत येण्याची शक्यता आहे ती भाजप नेत्या जयश्री पाटील यांची.

जयश्रीताई पाटील यांनी नुकताच आपला गट भाजपमध्ये सामील केला. त्यांच्या सोबत संग्राम पाटील यांचा देखील प्रवेश झाला असून, त्यामुळे भाजपमध्ये नव्या जोमाने मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. यंदा पहिल्यांदाच त्यांच्या पक्षप्रवेशानंतर निवडणुका होणार असल्याने, भाजप संग्राम पाटील यांना रिंगणात उतरवण्याची शक्यता नाकारता येत नाही.

सर्वसामान्य जनतेपासून ते स्थानिक पुढार्‍यांपर्यंत अनेकांचे हितसंबंध या निवडणुकीत गुंतलेले असल्यामुळे लढत अत्यंत चुरशीची होणार आहे.

कसबे डिग्रज गावात विशाल पाटील यांचे प्रभावशाली सर्कल आहे. बाजार समितीचे संचालक आनंदराव नलवडे यांचे नेतृत्व लाभल्यामुळे राष्ट्रवादी (शरद पवार गट) मजबूत स्थितीत आहे. नांद्रेत जयश्रीताई पाटील यांचा आणि त्यांच्या समर्थकांचा दबदबा आहे. त्याचबरोबर भाजपचे नेते पृथ्वीराज पाटील आणि पृथ्वीराज पवार यांचाही प्रभाव प्रस्थापित आहे.

मौजे डिग्रजमध्ये देखील राजकीय गणित वेगळेच आहे. भालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी शरद पवार गट कार्यरत आहे, तर विशाल पाटील यांचा गटही सक्रिय आहे. भाजपचे अस्तित्व देखील काहीअंशी जाणवते.

In Kasbe Digraj constituency, Mrs. Pooja Patil’s candidacy is under discussion, BJP leader Jayashree Patil is in religious crisis

या सार्‍या घडामोडींमध्ये एक गोष्ट स्पष्ट आहे – सौ. पूजा पाटील यांना उमेदवारी मिळवून देण्यासाठी खासदार विशाल पाटील आणि माजी मंत्री जयंत पाटील यांच्यात समन्वय, एकोप्याची गरज भासणार आहे.

जर महाविकास आघाडीने एकजुटीने, परस्पर विश्वासाने ही लढत लढली, तर सौ. पूजा पाटील विजयाची पताका फडकावू शकतात. परंतु, जर मतभेद उफाळले आणि आघाडीत अंतर पडले, तर दादा घराण्यातील ही निवडणूक अंतर्गत संघर्षात रूपांतरित होण्याची दाट शक्यता आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *