sangli crime news : सांगलीतील लॉजवर सुरु असणार्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा : शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवरील आर्या लॉजिंग येथे सुरु असणार्या तीनपानी जुगार अड्ड्यावर पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. याठिकाणी जुगार खेळणार्या आठ जणांवर कारवाई करत 2 लाख 52 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सांगली शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सदरची कारवाई केली.
sangli crime news : सांगलीतील लॉजवर सुरु असणार्या तीनपानी जुगार अड्ड्यावर छापा
आठ जणांवर कारवाई : 2 लाख 52 हजारांचा मुद्देमाल जप्त.
फारुख इलाही पखाले (वय 40), सद्दाम इस्माईल नदाफ (वय 32), शमशुद्दीन युसूफ पखाली (वय 37 तिघे रा.मुजावर प्लॉट), रुणाल रणजित कांबळे (वय 24 रा. पाटणे प्लॉट), सुमित प्रकाश चव्हाण (वय 51 रा. शिवाजी मंडई जवळ), सूरज दस्तगीर मांजरे (वय 38), आदित्य प्रकाश शिकलगार (वय 22 दोघे रा. भारतनगर) आणि रणजित रघुनाथ चव्हाण (वय 40 रा. राम मंदिर जवळ, सांगली) अशी कारवाई केलेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दिवाळीच्या पार्श्वभूमीवर शहातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी दिले होते. शहरातील सिव्हिल हॉस्पिटल रोडवर आर्या लॉज आहे. याठिकाणी काही जण तीनपानी जुगार खेळत असल्याची माहिती सांगली शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेला मिळाली.
यावेळी पथकातील कर्मचार्यांनी रविवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास याठिकाणी छापा टाकला. यावेळी आठ जण पैसे लावून तीनपानी जुगार खेळत असल्याचे निदर्शनास आले. त्यांच्याकडून रोख रक्कम, मोबाईल आणि दुचाकी असा एकूण 2 लाख 52 हजार 270 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. संशयितांना ताब्यात घेऊन महाराष्ट्र जुगार अधिनियम अंतर्गत कारवाई करण्यात आली.
सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अरुण सुगावकर, उपनिरीक्षक महादेव पोवार, कर्मचारी संदीप पाटील, सतीश लिंबळे, संतोष गळवे, गौतम कांबळे, प्रशांत पुजारी, योगेश सटाले, विशाल कोळी, गणेश कोळेकर, दिग्विजय 0साळुंखे आणि योगेश हाक्के यांच्या पथकाने केली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











