islampur political news : उरुण-इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक तोडीस-तोड लढवू ः आ.जयंत पाटील

SHARE:

islampur political news : उरुण-इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक तोडीस-तोड लढवू ः आ.जयंत पाटील : नगरपालिकेची निवडणूक तोडीस-तोड लढवू. चिंता करू नका. या शहरातील जनतेला गेल्या 8 वर्षात जो अनुभव आला, त्यावरून शहरातील जनता निश्चितपणे आपणास पसंती देतील. असा विश्वास माजी मंत्री आ.जयंतराव पाटील यांनी व्यक्त केला. तळागाळात जाऊन काम करणारा कार्यकर्ता हाच आपल्या पक्षाचा आधारस्तंभ असल्याचे गौरवोद्गारही त्यांनी काढले.

islampur political news : उरुण-इस्लामपूर नगरपालिकेची निवडणूक तोडीस-तोड लढवू ः आ.जयंत पाटील

शहरातील जनता निश्चितपणे आपणास पसंती देतील

उरूण-इस्लामपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने आयोजित बुथ अध्यक्ष व कार्यकर्ता संवाद ते मेळाव्यात बोलत होते. यावेळी शहरातील उत्कृष्ठ कामगिरी केलेल्या प्रथम पाच बुथचा आ.पाटील यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

याप्रसंगी प्रा.शामराव पाटील, शहराध्यक्षा शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष पै.भगवान पाटील, खंडेराव जाधव, मुनीर पटवेकर, अरुणादेवी पाटील, सुभाषराव सुर्यवंशी, महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात, युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. आ.पाटील म्हणाले, सर्वांनी विधानसभेला मोलाचे योगदान दिले आहे. लाडक्या बहिणी योजनेने आपले मताधिक्य कमी झाले.

शहरात गेल्या 7-8 वर्षात नवीन एकही काम झाले नाही. उलट जे काम सुरु होते, ते बंद पाडण्याचे काम केले आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचे काम गतीने चालू आहे. आपण सर्वांनी मतदार याद्यावर लक्ष ठेवा. यावेळी आपण प्रभावी युवा वक्तयांना संधी देऊ, ते आपण शहरात केलेले काम, आपली भूमिका लोकांपर्यंत जाऊन मांडतील.

यावेळी शहराध्यक्ष शहाजी पाटील, माजी नगराध्यक्ष आनंदराव मलगुंडे, पै.भगवान पाटील, अरुणादेवी पाटील, मुनीर पटवेकर, खंडेराव जाधव यांची भाषणे झाली. याप्रसंगी सुभाष सुर्यवंशी, शंकरराव चव्हाण, विलास ताटे, संदीप पाटील, रोझा किणीकर, रुपाली जाधव, शुभांगी शेळके, कोमल बनसोडे, संजय पाटील, शैलेश पाटील, अरुण कांबळे, शंकर महापुरे, अभिजित कुर्लेकर, प्रियांका साळुंखे यांच्यासह पदाधिकारी, माजी नगरसेवक, बुथ अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. महिला शहराध्यक्षा पुष्पलता खरात यांनी स्वागत केले. राज पाटील, मनिषा पेठकर, विजय देसाई यांनी सूत्रसंचालन केले.युवक शहराध्यक्ष दिग्विजय पाटील यांनी आभार मानले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *