swabhimani shetkri news : 3751 रूपये पहिला हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका : आज दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर सुरुवात आंदोलनाची आजच्या निवेदनापासून क्रांतीअग्रणी जी.डी.बापू लाड सहकारी साखर कारखाना कुंडल या कारखान्याचे चेअरमन शरद लाड व सोनहिरा सहकारी कारखान्याचे कार्यकारी संचालक शरद कदम यांना स्वाभिमानी शेतकरी संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी 24 व्या ऊस परिषदेमध्ये सर्व शेतकर्यांनी मागणी केल्याप्रमाणे ऊसाला पहिली उचल विना कपात 3751 रुपये व मागील हंगामातील गाळप झालेल्या उसाला दोनशे रुपये चा हप्ता देण्यात यावा त्याशिवाय कारखाने सुरू करू नये अशा आशयाचे निवेदन देण्यात आले
swabhimani shetkri news : 3751 रूपये पहिला हप्ता दिल्याशिवाय कारखाना सुरू करू नका
स्वाभिमानीचे कारखान्यांना निवेदन
उपरोक्त विषयास अनुसरून साखर कारखान्याचा गळीत हंगाम तोंडावर आलेला आहे. गेल्या वर्षभरात साखर व उपपदार्थांना चांगला दर मिळालेला आहे. वर्षभरातील साखरेची सरासरी काढल्यास 3800 रूपये क्विंटलने विक्री झालेली आहे. इथेनॅाल , बगॅस , मोलॅसिस , प्रेसमड , अल्कोहोल यासह इतर उपपदार्थांनाही चांगला भाव मिळाला असून गेल्या वर्षभरात भाव स्थिर होते.
ऊस उत्पादक शेतक-यांना गेल्या चार ते पाच वर्षात 3 हजार ते 3100 पर्यंत मिळाले आहेत. गेल्या पाच वर्षात केंद्र सरकारने वाढविलेल्या एफ. आर. पी. चे ऊस उत्पादक शेतक-यांना कोणताच लाभ झालेला नाही. साखर व उपपदार्थ विक्रीतून आलेल्या पैशामधून साखर कारखान्यांचा प्रक्रिया खर्च , तोडणी वाहतूक व व्याजाची रक्कम वजा जाता अजूनही कारखान्यांकडे पैसे शिल्लक राहिले असून प्रतिटन 200 रूपयाचा दुसरा हप्ता देणे सहज शक्य आहे. त्याबरोबरच चालू गळीत हंगामामध्ये 3751 रूपये दर देणे सहज शक्य आहे.
आपल्या कारखान्याकडून तोडणी वाहतूक प्रतिटन इतकी कपात केली जात आहे. वास्तिवक पाहता 25 किलोमीटर परिघामध्ये आपल्या कारखान्यास मुबलक ऊस असल्यानेच आपल्या कारखान्यास वाढीव गाळपास शासनाने मान्यता दिली आहे. यामुळे आपल्या कारखान्याने 25 किलोमीटर करिता असणारी प्रतिटन 750 रूपये तोडणी वाहतूक इतकीच कपात करणे गरजेचे आहे.
आपल्या कारखान्याकडून कार्यक्षेत्राबाहेरील 50 ते 100 किलोमीटर अंतरावरून ऊस वाहतूक करून लुबाडणूक केली जात आहे व वाढीव तोडणी वाहतुकीचा प्रतिटन 100 रूपयापासून ते 300 रूपयाचा अतिरिक्त खर्च शेतक-यांच्यावर पडू लागला आहे. यामुळे यावर्षी 25 किलोमीटरचीच तोडणी वाहतूक कारखान्याकडून कपात करण्यात यावी हि विनंती.
याबाबत आपणाकडून कार्यवाही न झाल्यास स्वाभिमानीच्या 24 व्या ऊस परिषदेत ठरल्याप्रमाणे 11 नोव्हेंबर नंतर तीव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सूर्यकांत मोरे जिल्हा कार्याध्यक्ष संदीप राजोबा बाळासो शिंदे धन्यकुमार पाटील मनोहर पाटील राजेंद्र माने रोहित पाटील बाळासाहेब जाधव बटु दादा फाळके अजमुद्दिन मुजावर अशोक पवार आप्पासो महाडिक अक्षय सूर्यवंशी जयदीप यादव उपस्थित होते
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











