asrani news : अंग्रेजों के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन : बॉलिवूडमधील दिग्गज अभिनेते आणि कॉमेडिअन असरानी यांनी आज अखेरचा श्वास घेतला. असरानी यांचं पूर्ण नाव गोवर्धन असरानी असं होते. मागील काही दिवसांपासून ते हॉस्पिटलमध्ये दाखल होते. मात्र 20 ऑक्टोबरला संध्याकाळी 4 वाजता उपचारादरम्यान त्यांचे प्राण गेले. असरानी 84 वर्षांचे होते.
asrani news : अंग्रेजों के जमाने का जेलर’ काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
फुफ्फुसांच्या समस्येमुळे गेल्या पाच दिवसांपासून असरानी यांना आरोग्य निधी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. असरानी यांचे मॅनेजर बाबूभाई थिबा यांनी असरानी यांच्या मृत्यूची पुष्टी केली. असरानी अनेक दिवसांपासून आजारी होते आणि त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते असं त्यांनी सांगितले.
शोले या सिनेमातून असरानी यांनी केलेली जेलरची भूमिका अनेकांच्या आजही स्मरणात आहे. हम अंग्रेजों के जमाने के जैलर हैं! हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. सुपरस्टार राजेश खन्ना यांच्यासोबत 1972 ते 1991 या काळात सुमारे 25 चित्रपटांमध्ये असरानी यांनी काम केले.
भागम भाग, हेरा फेरी, छुपके छुपके यासारख्या सिनेमात त्यांनी विनोदी अभिनेत्याची भूमिका साकारली होती. ते सहजपणे मुख्य भूमिका, सहाय्यक भूमिका किंवा विनोदी भूमिका साकारत होते.
1967 साली हरे काँच की चुडीया असरानी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. त्यांच्या पहिल्या काही भूमिका गंभीर स्वरूपाच्या होत्या, मात्र पुढे त्यांनी विनोदी अभिनयात एक स्वतंत्र ओळख निर्माण केली. 5 दशकांहून अधिक काळात असरानी यांनी 350 पेक्षा जास्त चित्रपटांमध्ये काम केले.
असरानी यांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी चला मुरारी हिरो बनने हा विनोदी चित्रपट स्वतः दिग्दर्शित करून प्रमुख भूमिका साकारली होती. असरानी हे सिच्युएशनल कॉमेडीचे मास्टर मानले जात होते. त्यांचा आवाज, संवादफेक आणि चेहर्यावरील भाव यामुळे ते प्रत्येक भूमिकेवर वेगळी छाप पाडत होते
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











