sangli crime news : माधवनगरमध्ये दोघा तरुणांवर तलवार कोयत्याने हल्ला टोळक्याच्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ

SHARE:

 sangli crime news : माधवनगरमध्ये दोघा तरुणांवर तलवार कोयत्याने हल्ला टोळक्याच्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ : माधवनगर येथील एका हॉटेल समोर गाडी लावण्याच्या वादातून चौघांनी मिळून दोघा तरुणांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत कोयत्याने वार करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली. सदरचा प्रकार हा रविवार दि. 19 ऑक्टोबर रोजी रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास घडला. या प्रकरणी सरनोबत दाऊद खान (वय 47 रा. सोमवार पेठ, माधवनगर) यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली आहे.

sangli crime news : माधवनगरमध्ये दोघा तरुणांवर तलवार कोयत्याने हल्ला टोळक्याच्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ

त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी हल्ला करणार्‍या रहीम मन्सूर पठाण (वय 24 रा. अहिल्यानगर, सांगली), आशुतोष दीपक मोहिते (वय 24), सेजल सुनील आवळे (वय 21 रा. यशवंतनगर) आणि सुमित सचिन माने (वय 24 रा. गुरुवार पेठ माधवनगर) या चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. या हल्ल्यात अशपाक आयुब शेख (वय 38 रा. शनिवार पेठ, माधवनगर) आणि सिद्धार्थ आटपाडीकर (रा. राजगुरूनगर झोपडपट्टी, सांगली) हे दोघेजण जखमी झाले आहेत.

संजयनगर परिसरात किरकोळ हाणामारी आणि प्राणघातक हल्ल्यांचे प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे. आधीच घरफोडी आणि चोर्‍यांनी त्रस्त झालेले माधवनगरकर आणि संजयनगर परिसरातील नागरिक फाळकुट दादांच्या त्रासाला कंटाळले आहेत. दोन दिवसांपूर्वी दिवाळीच्या पहाटेच एका तरुणाच्या खुनाची घटना ताजी असतानाच माधवनगर मध्ये दोघा तरुणांवर तालावर आणि कोयत्याने झालेल्या प्राणघातक हल्ल्याने खळबळ उडाली आहे.

जखमी आशपाक शेख आणि सिद्धार्थ आटपाडीकर हे दोघे रविवारी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून माधवनगर येथील मेनरोडवर असलेल्या सिमला हॉटेल येथे गेले होते. याठिकाणी गाडी लावण्याच्या कारणातून संशयित रहीम पठाण याने त्याच्या जवळ असलेल्या कोयत्याने आशपाक आणि सिद्धार्थ या दोघांवर हल्ला केला. सेजल आवळे आणि सुमित माने या दोघांनी त्यांच्या जवळ असलेल्या तलवारीने सिद्धार्थ आटपाडीकर याच्यावर वार करून त्याला जखमी केले.

यानंतर चौघांनी मिळून शिवीगाळ करत दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करत निघून गेले. गंभीर जखमी झालेल्या दोघांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. या प्रकरणी सरनोबत खान यांनी संजयनगर पोलिसात फिर्याद दिली असून संशयित चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *