kolhapur accident news : चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार : चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने दुचाकीस्वारास दिलेल्या धडकेत तिघे ठार झाले. कोल्हापूर-राधानगरी रोडवर कौलव येथे आज, मंगळवार सकाळच्या सुमारास हा अपघात झाला. ऐन दिवाळीतच अपघातात तिघे ठार झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
kolhapur accident news : चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोची दुचाकीला धडक, बहिण-भावासह तिघे ठार
श्रीकांत बाबासो कांबळे (तरसबळे, ता राधानगरी), दिपाली गुरुनाथ कांबळे (शेंडुर ता. कागल), पुतणी कौशिकी सचिन कांबळे अशी मृतांची नावे आहेत. तर अथर्व गुरुनाथ कांबळे (शेंडूर कागल) गंभीर जखमी झाला.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, श्रीकांत कांबळे हे बहिण दिपाली हिला घेवून दिवाळी सणाचा बाजार घेण्यासाठी भोगावती येथे गेले होते. बाजार करुन घरी परतताना चुकीच्या दिशेने आलेल्या टेम्पोने श्रीकांत यांच्या दुचाकीस धडक दिली. या धडकेत भाऊ श्रीकांत व बहिण दिपाली, पुतणी कौशिकी यांचा जागीच मृत्यू झाला. तर अथर्व गंभीर जखमी झाला.
जखमी अथर्वला उपचारासाठी तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातानंतर टेम्पो चालक पसार झाला होता. अपघातस्थळी मोठी गर्दी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरु आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











