nandre news : नांदे्ंरत यजमानपदाचा सवाल 61 लाख रूपये: मिरज तालुक्यातील नांद्रे येथे फेबु्रवारी 2026 मध्ये होणार्या पंचकल्याणक पुजेचा सवाल शुक्रवारी काढण्यात आला. यावेळी मुख्य सवाल सौधर्म इंद्र इंद्राणीचा सवाल येथील आदीनाथ नेमू चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबीयांनी 61 लाख रूपयांना घेतला. यावेळी इतर अनेक सवाल काढण्यात आले, अशी माहिती मंदिर मंदिर कमिटीचे चेअरमन जिनेश्वर पाटील यांनी दिली.
nandre news : नांदे्ंरत यजमानपदाचा सवाल 61 लाख रूपये
नांद्रे येथील श्र्री मद्देवाधिदेव 1008 मूलनायक तीर्थंकर भ. महावीर जिनमंदिरच्यावतीने 2 फेब्रुवारी 2026 ते 8 फेब्रुवारी 2026 पर्यंत पंचकल्याण पुजेचे आयोजन करण्यात आले आहे. या पुजेसाठी प्रतिष्ठाचार्य म्हणून अनिलकुमार बिरनाळे हे काम पाहणार असून, सहप्रतिष्ठाचार्य म्हणून प्रशांत बिरनाळे, बाहुबली उपाध्ये, अक्षयकुमार कलाजे हे काम करणार आहेत. त्यासाठीची सवाल शुक्रवारी काढण्यात आले. तसेच नेमिनाथ उपाध्ये, जिवंधर उपाध्ये, प्रशांत उपाध्ये, वसंत उपाध्ये हे स्थानिक पंडित आहेत.
अध्यात्मयोगी, चर्याशिरोमणी, पट्टाचार्य प. पू. 108 श्री विशुध्दसागरजी महामुनीराज यांचे आज्ञावृत्ती शिष्य प. पू. मुनीश्री108 सारस्वतसागरजी महाराज, जयंतसागरजी महाराज, सिध्दसागरजी महाराज, श्रुतसागरजी महाराज यांच्या परमपावन सानिध्यात, जगदगुरू स्वस्तिश्री जिनसेन भट्टारक पटाचार्य महास्वामी संस्थान मठ नांदणी यांच्या अधिनेृत्वात ही पूजा साजरी होणार आहे.
शुक्रवारी ध्वजारोहण, पूजा मंडप उद्घाटन, अखंड दीप प्रज्वलन, मंगल कलश स्थापना, सौधर्म इंद्र इंद्राणी, तीर्थंकर माता पिता, शास्त्र स्थापना, धनपती कुबेर, सुवर्ण सौभाग्यवती, यज्ञनायक, अष्टकुमारिका आदींचे सवाल काढण्यात आले. बोलीसम्राट राजेंद्र जैन, संगीतकार सचिन चौगुले यावेळी उपस्थित होते.
यावेळी सौधर्म इंद्र इंद्राणी आदीनाथ नेमू चौगुले, तीर्थंकर माता पिता कलगोंडा चवगोंडा पाटील, सुवर्ण सौभाग्यवती सौ. पुष्पावती नेमगोंडा पाटील, धनपती कुबेर कौशिक अनिल पाचोरे, यज्ञनायक विशाल रावसाहेब पाटील, ईशान्य इंद्र आप्पासाहेब सातगोंडा पाटील, अष्टकुमारिका श्र्री देवी ऐश्वर्या अभयकुमार पाटील, अर्षिता अमोल पाटील, ऐश्वर्या महावीर पाटील, आराध्या नितीन पाटील, संचिता संजय चौगुले, स्वप्नाली संजय चौधरी, अनुश्री संजय चौधरी, अनुश्री संतोष पाटील, जयश्री कलगोंडा पाटील आदींनी सवाल धरले.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











