sangli-peth-highway accident news : लक्ष्मी फाट्यावर भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे गंभीर जखमी: सांगली : पेठ राष्ट्रीय महामार्गावरील लक्ष्मी फाट्याजवळ भरधाव कारच्या धडकेत दिवाळीचा फराळ द्यायला निघालेल्या कुटुंबावर काळाने घाला घातला. सांगलीहून आष्टाच्या दिशेने निघालेल्या दुचाकीला पाठीमागून येणार्या सुसाट कार ने जोराची धडक देत चौघांना चिरडले. या भीषण अपघातात गंभीर जखमी झालेल्या श्रीमती सुगंधा अप्पासो शेडबाळे (वय 65 रा. काळभैरवनाथ गल्ली, नांदणी) यांचा मृत्यू झाला तर मुलगा संतोष अप्पा शेडबाळे (वय 39), नातू सुजल शेडबाळे आणि आदिती शेडबाळे हे तिघेजण गंभीर जखमी झाले.
sangli-peth-highway accident news : लक्ष्मी फाट्यावर भरधाव कारच्या धडकेत वृद्ध ठार, तिघे गंभीर जखमी
सदरचा अपघात हा बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी जखमी संतोष शेडबाळे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की, जखमी संतोष शेडबाळे हे आपल्या कुटुंबीयांसह कोल्हापूर जिल्ह्यातील नांदणी गावांमध्ये राहतात. त्यांची भाची पूजा चौगुले या मिरज तालुक्यातील कसबेडीग्रज गावामध्ये राहण्यास आहे.
बुधवार दि. 22 ऑक्टोबर रोजी दुपारी साडे तीन वाजण्याच्या सुमारास संतोष शेडबाळे हे त्यांची मोटरसायकल ( क्र. एमएच 09 सीएस 9327) वरून नांदणी येथून दिवाळीचा फराळ त्यांच्या भाचीला देण्यासाठी आई मृत सुगंधा शेडबाळे, मुलगा सुजल आणि मुलगी आदिती या तिघांसोबत मिरज तालुक्यातील कसबेडिग्रज गावाकडे येत होते. दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी फाटा येथील लाकूड वखारी समोर त्यांची दुचाकी आली.
यावेळी पाठीमागून भरधाव वेगात एक अज्ञात चालक त्याच्या ताब्यातील मारुती ब्रेझा (क्र. एमएच 10 डीक्यू 7471) ही कार भरधाव वेगात घेऊन आला. या कार ने पाठीमागून शेडबाळे यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात सुगंधा शेडबाळे या गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला तर दुचाकीवरील अन्य तिघेजण गंभीर जखमी झाले.
अपघातानंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी संतोष शेडबाळे यांनी सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात कार चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











