ingali kolhapur news : पांढर्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू : वेळ मध्यरात्रीची…काही तरुण अचानक बाहेर पडतात अन पांढर्या फडक्यात ठेवलेले प्राण्यांचे अवयव, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग थेट वेशीवर आणून ठेवतात. हे सगळे पाहून कुणीही घाबरेल…इंगळी (ता. हातकणंगले) या गावात ऐन दिवाळीत घडलेल्या या अघोरी पूजेने हातकणंगले तालुका भयभीत झाला आहे. सद्या याचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
ingali kolhapur news : पांढर्या फडक्यात जनावराचे काळीज, कुंकू, गुलाल, लिंबू
इंगळीत मध्यरात्रीच तरुणांनी मांडली अघोरी पूजा
इंगळीत आठ ते दहा तरुणांनी मध्यरात्री गावात फिरून अघोरी पूजा केल्याचे उघड झाले आहे. गावातील सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे तरुण गावात संशयास्पद हालचाली करताना दिसत आहेत. पहाटे गावकर्यांनी इंगळी गावाच्या कमानीजवळ रस्त्याच्या मध्यभागीच पांढर्या फडक्यात ठेवलेले जनावराचे काळीज, त्याभोवती कुंकू, गुलाल, लिंबू, केळी आणि केळीच्या झाडाचा कट केलेला भाग पाहिला. या दृश्याने ग्रामस्थांना धक्का बसला.
त्यांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी प्राथमिक तपासही सुरू केला आहे. हा प्रकार कोणत्यातरी अघोरी पूजेचा भाग असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
इंगळी परिसरात काही वर्षांपूर्वी अशाच स्वरूपाची घटना घडली होती. त्या वेळीही गावाच्या बाहेर अघोरी वस्तू आणि प्राण्यांचे अवयव आढळले होते. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक गडद झाले आहे. सध्या पोलिसांनी संपूर्ण परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. दिवाळीसारख्या सणासुदीच्या काळात घडलेल्या या अघोरी प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











