kavtepiran zp news : कवठेपिरान मतदार संघातून सरपंच अनिता मानेंचे नाव चर्चेत

SHARE:

kavtepiran zp news : कवठेपिरान मतदार संघातून सरपंच अनिता मानेंचे नाव चर्चेत : मिरज तालुक्यातील कवठेपिरान हा जिल्हा परिषद मतदारसंघ आज राजकीय वर्तुळात चर्चेचा अखंड विषय ठरला आहे. या मतदारसंघाचे वैशिष्ट्यच असे की, तो नेहमीच थोर परंपरा, झुंजार नेतृत्व आणि विकासाच्या शर्यतीसाठी ओळखला जातो. यंदाच्या निवडणुकीत या भूमीवर पुन्हा एकदा नव्या नेतृत्वाची चाहूल लागली आहे – आणि त्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत हिंदकेसरी मारुती माने यांची सुनबाई, तसेच माजी जिल्हा परिषद सदस्य भिमराव माने यांची पत्नी सौ. अनिता माने!

kavtepiran zp news : कवठेपिरान मतदार संघातून सरपंच अनिता मानेंचे नाव चर्चेत

या मतदारसंघात सौ. अनिता माने यांचे नाव प्रचंड जोशात पुढे सरकत आहे. गावोगावी, वाडीवस्त्यांवर आणि महिला बचतगटांच्या बैठकीत एकच चर्चा – अनिताताई पुन्हा कवठेपरानचा गौरव वाढवणार!

सरपंच म्हणून त्यांनी गेल्या पाच वर्षांत आपल्या कार्यकाळात गावाचा चेहरा बदलला आहे. कोट्यवधी रुपयांच्या विकासकामांद्वारे त्यांनी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आणि महिलांच्या सक्षमीकरणाचा पाया भक्कम केला आहे. त्यांच्या कार्यातून ग्रामविकासाचा नवा आराखडा निर्माण झाला आहे – आणि त्यामुळे कवठेपरान आज पुन्हा एकदा ‘आदर्श ग्राम’ बनण्याच्या उंबरठ्यावर उभे आहे.

मुख्यमंत्री पंचायतराज अभियानांतर्गत त्यांनी कवठेपरान राज्यात नंबर वन करायचेच! असा जिद्दीचा नारा दिला आहे. हा नारा केवळ राजकीय घोषवाक्य नाही, तर तो आहे गावच्या प्रत्येक स्त्री-पुरुषांच्या मनातील आत्मविश्वासाचा आवाज. महिलांच्या संघटन शक्तीच्या भक्कम पाठबळावर अनिता माने आता ग्रामविकासातून जिल्हास्तरीय नेतृत्वाकडे वाटचाल करत आहेत.

ग्रामपातळीवर त्यांच्या कार्यपद्धतीत पारदर्शकता, प्रामाणिकपणा आणि लोकसहभागाचा अद्वितीय संगम दिसतो. म्हणूनच, स्थानिक पातळीपासून पक्षाच्या उच्चस्तरापर्यंत, त्यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक चर्चा सुरू आहे.
विश्वसनीय सूत्रांच्या माहितीनुसार, कवठेपिरान जिल्हा परिषद मतदारसंघातून महायुतीकडून – म्हणजेच भाजपकडून – सौ. अनिता माने यांची उमेदवारी निश्चित होण्याची प्रबळ शक्यता व्यक्त केली जात आहे.

आज गावातील वृद्धांचा आशीर्वाद, महिलांचा विश्वास, आणि तरुण पिढीचा जोश या तिन्हीचा संगम अनिता माने यांच्या पाठीशी उभा आहे. त्यामुळे कवठेपरानच्या राजकारणात एक नवा अध्याय लिहिला जाण्याची चिन्हे स्पष्टपणे दिसू लागली आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *