sangli mnp news : सहा माजी नगरसेवकांचे प्रवेश मग, 22 तिकीटे कुणाला? आ. सुधीर गाडगीळ यांचा सवाल

SHARE:

sangli mnp news : सहा माजी नगरसेवकांचे प्रवेश मग, 22 तिकीटे कुणाला? आ. सुधीर गाडगीळ यांचा सवाल : महानगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण तापत असताना भाजपमध्ये खदखद व्यक्त होत असल्याचे बुधवारी स्पष्ट झाले. भाजपमध्ये पक्षप्रवेशाचे वारे वाहू लागल्याने निष्ठावंतात नाराजी उफाळून येत आहे. महापालिका क्षेत्रात सहा माजी नगरसेवकांनी प्रवेश केला असताना 22 तिकिटे कुणाला ? असा सवाल आ. सुधीर गाडगीळ यांनी व्यक्त करीत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वक्तव्यावर उघडपणे नाराजी व्यक्त केली. मात्र भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला.

sangli mnp news : सहा माजी नगरसेवकांचे प्रवेश मग, 22 तिकीटे कुणाला? आ. सुधीर गाडगीळ यांचा सवाल

निष्ठावंतांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही

आगामी सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने रणनिती आखण्यास सुरुवात केली आहे. पक्षात नव्याने येणार्‍यांना प्रवेश देवून थेट तिकीट देण्यात येणार असल्याबाबत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी जाहीर केले, याबाबत आ. सुधीर गाडगीळ यांनी पत्रकाव्दारे उघडपणे नाराजी व्यक्त केली. भाजपसाठी प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना न्याय देण्याचा निर्धार आम्ही केला असून, कोणत्याही कार्यकर्त्याला वार्‍यावर सोडले जाणार नाही.

आ. गाडगीळ म्हणाले की, पक्षात नव्या कार्यकर्त्यांचा प्रवेश सुरू आहे. पण यामुळे निष्ठावंत व दिवसरात्र राबणार्‍या जुन्या कार्यकर्त्यांवर अन्याय होऊ देणार नाही. काहीजण पालकमंत्री यांची दिशाभूल करून आपल्याला हवे तसे वक्तव्य करून घेत आहेत. नुकतेच पालकमंत्र्यांनी 22 तिकीटे देणार असल्याचे सांगितले, परंतु महापालिका क्षेत्रात नव्याने केवळ सहा नगरसेवकांनी पक्षप्रवेश केला आहे. मग 22 तिकीटे कुणाला देणार? असा प्रश्न आ. गाडगीळ यांनी उपस्थित केला.

केवळ पूर्वी ते निवडून आले म्हणून उमेदवारी देणे योग्य नाही. त्या त्या प्रभागातील कार्यकर्त्यांची मते, जनतेचा विचार करूनच उमेदवारीचे वाटप होईल. कुणावरही अन्याय होणार नाही, याची दक्षता आम्ही घेऊ. गत महापौर निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता. मात्र त्यांनी आपली चूक मान्य करुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले असल्याचे आमदारांनी सांगितले. त्याचप्रमाणे विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कोणी कोणी काम केले आहे, त्याचा लेखा जोखा पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे मी सादर करणार आहे.

काही नेत्यांच्या वक्तव्यांमुळे कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. मात्र, निष्ठावंत कार्यकर्त्यांना मी वार्‍यावर सोडणार नाही. मी तीन वेळा सांगली विधानसभा मतदार संघाचे नेतृत्व केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी प्रामणिक काम केलेल्या कार्यकर्त्यांना न्याय मिळावा, यासाठी मी कटिबद्ध आहे, असे आ. गाडगीळ यांनी ठामपणे नमूद केले.

विधानसभेला विरोधात काम केलेल्यांची वरिष्टांकडे तक्रार करणार

मागील महापौर निवडणुकीत काही नगरसेवक फुटल्यामुळे पक्षाला तोटा झाला होता. मात्र त्यांनी आपली चूक मान्य करुन विधानसभा निवडणुकीत पक्षाचे काम केले. विधानसभा निवडणुकीवेळी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात कुणी-कुणी काम केले आहे, त्याचा लेखा जोखा पक्षाच्या वरिष्ठांच्याकडे मी सादर करणार असल्याचे आ. सुधीर गाडगीळ यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *