mahapalika election news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत

SHARE:

mahapalika election news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत : महापालिकेच्या 78 जागांसाठी आरक्षण सोडतीची प्रक्रिया मंगळवार दि. 11 नोव्हेंबरला मिरज येथील बालगंधर्व नाट्यगृहात पार पडणार आहे. मागासवर्गीय लोकसंख्येच्या उतरत्या क्रमानुसार 12 जागा प्रभागानिहाय आरक्षित केल्या आहेत. तर ओबीसींसाठी देखील 21 जागा असणार आहेत. 50 टक्के महिलांसाठी जागा राखीव असणार आहेत. त्यामुळे मंगळवारी होणार्‍या या आरक्षण सोडतीकडे इच्छुकांचे लक्ष लागले असून अनेकांनी देव पाण्यात ठेवले आहेत.

mahapalika election news : महापालिकेच्या निवडणुकीसाठी 11 नोव्हेंबरला आरक्षण सोडत

महापालिकेच्या निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचना तयार झाली आहे. आता 78 जागांसाठी आरक्षण सोडत प्रक्रिया मंगळवार दि. 11 नोव्हेंबरला होणार आहे. यामध्ये अनुसूचित जातीसाठी 11, अनुसूचित जमातीसाठी 1, नागरिकांचा मागासप्रवर्गासाठी 21 तर खुल्या गटासाठी 45 जागा असणार आहेत. चार टप्प्यात आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आहे. यामध्ये पहिल्या टप्प्याम मागासवर्गीय जागा निश्चित करणे, आरक्षण सोडत, त्यावर हरकती व अंतिम प्रसिध्दी याचा समावेश आहे. पहिल्या टप्प्यात प्रभागात जागा आरक्षित केल्या आहेत. त्यामध्ये 11 जागा या अनुसूचित जाती प्रवर्गासाठी आरक्षित केल्या आहेत.

यात सांगली येथील प्रभाग दहा, अकरा, चौदा, अठरा, एकोनीस तर मिरज येथील प्रभाग क्रमांक तीन, सात, वीस व कुपवाड येथील प्रभाग क्रमांक एक, दोन, आठ या प्रभागात अनुसूचित जातीचे आरक्षण असणार आहे. तर अनुसूचित जातीच्या लोकसंख्येप्रमाणे प्रभाग क्रमांक वीस हा आरक्षित केला आहे. एकूण लोकसंख्येच्या तुलनेत या प्रभागात सर्वाधिक अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहेत.

त्यानुसार हे प्रभाग आरक्षित आहेत. त्याला राज्य निवडणूक आयोगाने मान्यता दिली आहे. या निवडणुकीत नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी (ओबीसी) 21 जागा आरक्षित असणार आहेत. तर खुल्या गटासाठी 45 जागा आहेत. एकूण 78 जागांपैकी 39 जागा हा महिलांसाठी आरक्षित होणार आहेत. आरक्षण सोडतीनंतर महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, आरक्षण सोडत झाल्यानंतर प्रारूप आरक्षणाची प्रसिध्दी दि. 17 नोव्हेंबरला करण्यात येईल. त्यावर दि. 18 ते दि. 24 नोव्हेंबरपर्यंत सूचना व हरकती दाखल करता येणार आहे. प्रभाग समिती एक ते चार या कार्यालयात हरकती दाखल करता येणार आहे. त्यानंतर सुनावणी होऊन आरक्षण अंतिम करण्यात येणार आहे.

आरक्षण सोडत प्रक्रिया (एकूण जागा 78)
* खुल्या प्रवर्गातील जागा- 45
* नागरिकांचा मागास प्रवर्ग जागा- 21
* अनुसूचित जाती जागा- 11
* अनुसूचित जमाती जागा- 1
* महिलांसाठी 50 टक्केप्रमाणे जागा- 39

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *