vita election news : विटा पालिकेच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात

SHARE:

vita election news : विटा पालिकेच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात : माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील यांचे कट्टर समर्थक आणि माजी नगरसेवक प्रशांत विश्वनाथ कांबळे यांनी प्रभाग 13 अ मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. याच प्रभागातून त्यांचे कनिष्ठ बंधू आमदार सुहास बाबर यांचे यांचे वर्गमित्र आणि कट्टर समर्थक भालचंद्र विश्वनाथ कांबळे यांनी यापूर्वीच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.

vita election news : विटा पालिकेच्या निवडणुकीत दोन सख्खे भाऊ एकमेकांच्या विरोधात

प्रशांत कांबळे आणि भालचंद्र कांबळे यांचे एकमेकांविरोधात अर्ज दाखल ; प्रभाग 13 मध्ये रंगणार हायव्होल्टेज लढत

माजी नगरसेवक प्रशांत कांबळे हे भाजप गटाकडून प्रबळ दावेदार आहेत. तर भालचंद्र कांबळे हे विरोधी शिवसेनेकडून निवडणुकीत लढण्यासाठी मैदानात उतरले आहेत.

माजी नगरसेवक प्रशांत कांबळे हे माजी आमदार अँड. सदाशिवराव पाटील यांचे कट्टर समर्थक म्हणून राजकीय पटलावर सक्रिय आहेत. तसेच माजी नगराध्यक्ष अँड वैभव यांचे वर्गमित्र आणि निकटवर्तीय समर्थक म्हणून ओळखले जातात. यापूर्वी सन 2006 च्या नगरपालिका निवडणूकीत प्रभाक क्र. 20 मधून सर्वाधिक मताधिक्क्य मिळवून निवडून येणारे नगरसेवक म्हणून त्यांना काम करण्याची पहिल्यांदाच संधी मिळाली.

पाटील गटाचे खंदे समर्थक म्हणून ते मागील दोन पिढ्यांप्रमाणेच लोकनेते हणमंतराव पाटीलसाहेबांच्या कुटुंबांवरती प्रेम करत सामाजिक कार्यात सक्रिय आहेत. सुभाषराव कला, क्रीडा व सांस्कृतिक मंडळाच्या माध्यमातून फुलेनगरसह विटा शहरातील युवकांचे संघटन केले. एक अभ्यासू आणि व्हिजनरी नगरसेवक म्हणून त्यांनी काम केले आहे. पाणीपुरवठा सभापती, आरोग्य सभापती, बांधकाम सभापती यासारखी महत्वाची सभापती पदाची धुरा सांभाळली आहे.

तर भालचंद्र कांबळे हे कायद्याचे पदवीधर आहेत. त्यांचे युवा संघटन चांगले आहे. विघ्नहर्ता युथ क्लबच्या माध्यमातून विटा शहरासह खानापूर तालुक्यातील युवकांचे चांगले संघटन केले आहे.

प्रभाग क्रमांक 13 मधून प्रशांत कांबळे आणि भालचंद्र कांबळे या कांबळे बंधूनी एकमेकांविरोधात अर्ज दाखल केला आहे. माघारीनंतरच लढतीवर शिक्कामोर्तब होणार असले तरी विटेकरांच्या नजरा या प्रभागाकडे लागल्या आहेत. त्यामुळे विटा नगरपालिकेच्या राजकारणात दोन सख्ख्या भावांकडे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *