nagarpalika election news : नगरपालिका निवडणूक अर्जासाठी सोमवारी अखेरचा दिवस; ऑफलाईनची मुभा

SHARE:

nagarpalika election news : नगरपालिका निवडणूक अर्जासाठी सोमवारी अखेरचा दिवस; ऑफलाईनची मुभा : जिल्ह्यातील सहा नगरपालिका तर दोन नगरपंचातयीच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष व नगरसेवकपदासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोमवार दि. 17 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत आहे. रविवारअखेर नगराध्यक्षपदासाठी 56 तर सदस्यपदासाठी 711 अर्ज दाखल झाले.

nagarpalika election news : नगरपालिका निवडणूक अर्जासाठी सोमवारी अखेरचा दिवस; ऑफलाईनची मुभा

रविवारअखेर नगराध्यक्षपदासाठी 56 तर सदस्यपदासाठी 711 अर्ज

दरम्यान, संगणक प्रणालीव्दारे अर्ज भरण्यास अडचण निर्माण होत असल्याने राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन अर्ज दाखल करण्यास मुभा दिली आहे. जिल्ह्यातील उरूण-ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस नगरपालिकेसाठी तर शिराळा व आटपाडी नगरपंचायतीसाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 10 रोजीपासून सुरू झाली आहे.

शनिवार दि. 15 व रविवार दि. 16 रोजी सार्वजनिक सुट्टी होती. मात्र राज्य निवडणूक आयोगाने सुट्टीच्या दिवशी देखील अर्ज भरण्यास उमेदवारांना मुभा दिली होती. त्यानुसार शनिवार व रविवारी अर्ज दाखल झाले आहेत. रविवारी एका दिवसात नगराध्यक्षपदासाठी 16 तर सदस्यपदासाठी 364 अर्ज दाखल झाले आहेत. सोमवार दि. 17 रोजी दुपारी तीन वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे.

तसेच नामनिर्देशनपत्र संगणकप्रणालीद्वारे ऑनलाईन पद्धतीने स्वीकारण्यात येत आहे. परंतु, आता संगणकप्रणालीद्वारे स्वीकारण्यात येणार्‍या नामनिर्देशनपत्रामध्ये अडचणी येत असल्याचे निदर्शनास आल्याने तसेच नामनिर्देशनपत्रे सादर करण्याकरिता एकच दिवस शिल्लक असल्याने संगणकप्रणालीवर भार येण्याची शक्यता लक्षात घेता आणि उमेदवारांना समान संधी उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीकोनातून राज्य निवडणूक आयोगाने ऑफलाईन पध्दतीने अर्ज दाखल करण्यास मुभा दिला आहे. सोमवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता आहे.

रविवारअखेर दाखल झालेले अर्ज

नगराध्यक्ष सदस्य
उरूण-ईश्वरपूर 6, 57
विटा 7, 144
आष्टा 10, 54
तासगाव 4, 54
जत 6, 83
पलूस 3, 56
शिराळा 10, 97
आटपाडी 10, 118
एकूण 56, 711

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *