vita election news : विरोधकांचे 8 माजी नगरसेवक फुटले अमोल बाबर यांचा मोठा गौप्यस्फोट : कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर विटा नगरपालिकेची ताकतीने लढवणार आहोत. सत्ताधारी गटाचे आठ माजी नगरसेवक आमच्या पार्टीकडून निवडणूक लढवत आहेत, असा धक्कादायक राजकीय गौप्यस्फोट शिवसेनेचे नेते माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी केला.
vita election news : विरोधकांचे 8 माजी नगरसेवक फुटले अमोल बाबर यांचा मोठा गौप्यस्फोट
नगरसेवक पदासाठी अमोल बाबर यांचे दोन उमेदवारी अर्ज दाखल
यावेळी बोलताना अमोल बाबर म्हणाले, विटा पालिकेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासह 27 उमेदवारांचे उमेदवारी अर्ज आम्ही शिवसेनेच्यावतीने दाखल केले आहेत. विटा पालिकेची निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर ताकतीने लढवणार आहोत. विकासकामांचा झंजावात निर्माण केला आहे. त्यामुळे विटा शहरात विकासाचे वादळ निर्माण झाले आहे. चांगल्या पद्धतीने विकासाचे राजकारण करण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. या निवडणुकीत जनता आम्हाला आशीर्वाद देऊन चांगल्या मताधिक्याने सत्ता देणार आहे. नगरपालिका निवडणुकीसाठी आम्हाला चांगले वातावरण आहे.
विधानसभा निवडणुकीत आम्हाला विटा शहरातून मिळालेल्या साडेचार हजार मताधिक्याचा विरोधकांनी धसका घेतला आहे. सत्ताधारी गटाचे आठ नगरसेवक आमच्या पार्टीतून उमेदवारी अर्ज भरून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे आमच्यासाठी चांगले वातावरण आहे.
चांगले मताधिक्याने आमची सर्व उमेदवार निवडून येतील. कुणाला राजकारणात संपवण्यासाठी किंवा शह देण्यासाठी आम्ही निवडणूक लढवत नाही तर विकासाच्या मुद्द्यावर नगरपालिकेची निवडणूक लढवणार आहे.विटा शहराचा राहिलेला विकास करणे हेच आमचे या निवडणुकीला सामोरे जाण्यामागील भूमिका आहे.
विटा नगरपालिकेच्या 13 प्रभागातील 26 जागा आणि थेट नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रक्रिया सुरू झाली आहे. अर्ज दाखल करण्याचा उद्या शेवटचा दिवस आहे. त्यामुळे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी उमेदवार अर्ज दाखल करण्यासाठी यंत्रणा गतिमान केली होती. नगरसेवक पदासाठी शिवसेनेकडून आज
राजकीय पटलावरील किंगमेकर जिल्हा बँकेचे संचालक आणि माजी नगरसेवक अमोल बाबर यांनी आज आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 9 मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी माजी सभापती विनय भंडारे, सुनील मेटकरी, प्रवीण साठे, कृष्णात गायकवाड, विटा मर्चंट बँकेचे चेअरमन विनोद गुळवणी, मंथन मेटकरी, शरद बाबर, श्रीधर जाधव, सुरेश पाटील, महेश मेटकरी, भारत पवार, माजी नगरसेवक अविनाश चोथे, मुकुंद लकडे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











