bhalchandra patil : भालचंद्र पाटील : समाजहिताचा सुवर्णअध्याय

SHARE:

bhalchandra patil : भालचंद्र पाटील : समाजहिताचा सुवर्णअध्याय  समाजसेवा, शिक्षण, संघटनात्मक विकास आणि माणुसकीची उब या सर्वांची एक सुंदर वीण ज्या व्यक्तीच्या कार्यातून उमटते, ते म्हणजे सांगलीचे सुपुत्र, दूरदृष्टीचे नेतृत्व, उद्योगविश्वातील दमदार व्यक्तिमत्त्व मा. भालचंद्र विरेंद्र पाटील.
आज त्यांचा वाढदिवस त्यानिमित्ताने….

bhalchandra patil : भालचंद्र पाटील : समाजहिताचा सुवर्णअध्याय

विश्वासाची दुसरी मोहोर – दक्षिण भारतच्या अध्यक्षपदी पुनर्निवड

दक्षिण भारत जैन सभेच्या इतिहासात अत्यंत मानाचे मानले जाणारे अध्यक्षपद. त्या पदावर दुसर्‍यांदा, तेही एकमताने, भालचंद्र पाटील यांची निवड होणे म्हणजे त्यांची कार्यक्षमता, कर्तव्यनिष्ठा आणि समाजाशी असलेली नाळ यावरची ठाम शिक्कामोर्तबच!
सन 2025 ते 2028 या त्रैवार्षिक कार्यकाळासाठी समाजाने दिलेला हा प्रचंड विश्वास म्हणजे त्यांच्या नेतृत्वाच्या तेजाला दिलेली उज्ज्वल कोंदणच होय.

ज्यांनी सभेला जागवले, गतिमान केले – असा झंझावाती नेता

गत 15 वर्षांपासून त्यांनी संघटनेच्या प्रत्येक धाग्याला उर्जा, दिशा आणि नवी ओळख दिली आहे. अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर केवळ सहा महिन्यांत सभेच्या कार्याचा चेहरामोहरा बदलून टाकणारे हे नेतृत्व म्हणजे कामाची गती, संवेदनशीलता आणि कुशल दूरदृष्टी यांचा अप्रतिम संगम.

सभासदांची क्रांती – प्रत्येक घरापर्यंत पोहोचलेली सभा

‘दक्षिण भारत जैन सभा प्रत्येक घरात पोहोचली पाहिजे’ – ही त्यांच्या मनातली केवळ कल्पना नव्हती, तर ती एक प्रखर ध्येयवेड होती. त्यांनी हजारोंना आवाहन केले, दरवाजे ठोठावले, माणसांशी नाळ जोडली आणि परिणामी दहा हजारांहून अधिक नवे सभासद झाले. ही फक्त संख्या नाही, तर त्यांनी उभा केलेला विश्वासाचा महासागर आहे.

शिक्षणासाठी हळवे मन – नवी आशादारे

पुण्यात नवीन बोर्डिंग सुरू
ग्रामीण व दुर्बल विद्यार्थ्यांसाठी पुण्यासारख्या शिक्षणनगरीत त्यांनी बोर्डिंग उभे केले-
ज्यामुळे असंख्य विद्यार्थ्यांच्या भविष्याला नवी दिशा, नवे पंख लाभले.

शिष्यवृत्तीचा महापूर- 50 लाखांचे दान

दक्षिण भारत जैन सभेकडे शिष्यवृत्ती फंड आहे. या फंडाचे वर्षाला जेवढे व्याज येते ते सर्व व्याज ‘प्रथमाचार्य शांतिसागर शैक्षणिक दत्तक शिष्यवृत्ती योजना’ च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वाटले जाते. दक्षिण भारत जैन सभेच्या माध्यमातून त्यांनी 50 लाखांहून अधिक रक्कम विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती रूपात दिली आहे. पूर्वी दक्षिण भारत जैन सभेकडे शिष्यवृत्ती मागण्यासाठी हजारो अर्ज येत होते. कुणाला नाराज न करता प्रत्येकाला पाच हजार शिष्यवृत्ती दिली जायची. परंतु भालचंद्र पाटील अध्यक्ष झाल्यानंतर शिष्यवृत्ती फंडासाठी अनेक देणग्या गोळा केल्या. त्यामुळे व्याजाची रक्कम वाढली. वर्षाला सुमारे 100 विद्यार्थी दत्तक घेवून त्यांचा पूर्ण शैक्षणिक खर्च करण्याची जबाबदारी सभेने उचलली आहे. हा त्यांच्या करुणेचा, शिक्षणप्रेमाचा आणि समाजदायित्वाचा देदीप्यमान पुरावा आहे.

मुंबईमध्ये नव्या स्वप्नांची पायाभरणी

मुंबईसारख्या महानगरात सभेचे आधुनिक कार्यालय व वसतीगृह उभारणे-
ही केवळ योजना नाही, तर संस्थेचे क्षितिज विस्तारण्याचा भव्य संकल्प आहे!

युवा नेतृत्वाची नवीन फळी – भविष्याचा भक्कम पाया

भालचंद्र पाटील यांनी संघटनेला केवळ आजच नव्हे, तर उद्याही सक्षम करण्याचा संकल्प केला. तरुणाईला पुढे आणून दुसरी नेतृत्वरेषा कार्यक्षम कार्यकर्त्यांची फळी तयार केली आहे. यामुळे सभा अधिक गतिमान, उत्साही आणि काळाच्या आव्हानांना समर्थपणे सामोरी जाणारी बनली आहे.

समाजाला खात्री – भविष्य उज्ज्वल, दिशा सक्षम

भालचंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण भारत जैन सभा सामाजिक क्षेत्रात, शैक्षणिक विकासात, आर्थिक सबलीकरणात अजूनही भरीव कार्य करेल, या विश्वासाने संपूर्ण समाज आज त्यांच्या पाठीशी ठाम उभा आहे.
भालचंद्र पाटील यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

आज त्यांचा वाढदिवस म्हणजे, समाजहिताचा उत्सव, सेवाभावाचा सोहळा, नेतृत्वाच्या प्रकाशाचा नवा उगम. त्यांचे आयुष्य दीर्घ, तेजस्वी व समाजासाठी सतत उपकारक राहो- हीच मंगल कामना.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, भालचंद्र पाटील साहेब!

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *