ashta election news : आष्ट्यात चुरशीची 74.78 टक्के मतदान

SHARE:

ashta election news : आष्ट्यात चुरशीची 74.78 टक्के मतदान :  आष्टा नगरपरिषद निवडणुकीसाठी 37 मतदान केंद्रावर मंगळवार दिनांक 2 डिसेंबर रोजी प्रभाग3 व 9चा किरकोळ वादाचा अपवाद वगळता मतदान शांततेत पार पडले. प्रभाग 3 सिद्धार्थ नगर येथे व प्रभाग 5 मधील मतदान केंद्रावर इ व्ही एम मशीन सुरवातीलाच तासभर बंद पडले होते. त्यानंतर नवीन मशीन आणून मतदान प्रक्रिया सुरू करण्यात आली.

ashta election news : आष्ट्यात चुरशीची 74.78 टक्के मतदान

सर्व मतदारांनी मतदानाचा हक्क बजवावा असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी राजशेखर लिंबारे मुख्याधिकारी अवधूत कुंभार नायब तहसीलदार राजेश रजपूत तसेच अनेक सामाजिक संस्थानी केले होते. त्यास नवमतदार, जेष्ठ नागरिक, दिव्यांग मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत एकूण 30,574 मतदारांपैकी 22,864 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. आष्ट्यात एकूण 74.78 टक्के मतदान झाले.

आष्टा शहर विकास आघाडी विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्ष भाजप विरुद्ध शिवसेना आशा तिघात ही लढत झाली असली तर नगराध्यक्ष पदासाठी विशाल शिंदे विरुद्ध प्रवीण माने अशी दुहेरी लढत आहे. एकूण 72 उमेदवार रिंगणात उतरले असून मतदार राजाने कोणाला साथ दिली हे 21 डिसेंबर ला स्पष्ट होईल.

शहरातील विलासराव शिंदे विद्यालय, कन्या शाळा, जिल्हा परिषद शाळा क्रमांक एक सह विविध जिल्हा परिषदेच्या शाळा, सामाजिक सभागृह या ठिकाणी मतदान केंद्रावर एकूण 205 कर्मचारी इतर 59 कर्मचारी आहेत तर 112 होमगार्ड तर 66 अंमलदार सहा पोलीस अधिकारी कर्तव्य बजावले.

कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या सोबत एस आर पी एफ चे जवान दाखल झाले होते. हे शहरातील सर्वच मतदान केंद्रावर थेट नगराध्यक्ष पदासाठी व बारा प्रभागातील 24 उमेदवारासाठी मतदान प्रक्रीया पार पडली. मतमोजणी केंद्र विलासराव शिंदे बहुउद्देशीय हॉल या ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदान मोजणी 21 डिसेंबर रोजी होत असल्याने ईव्हीएम मशीन बहुउद्देशीय हॉलच्या स्ट्राँग रूम मध्ये सुरक्षित, पोलीस बंदोबस्तात व सीसीटीव्ही च्या कक्षेत ठेवण्यात आल्या असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी राजशेखर लिंबारे यांनी सांगितले.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *