mahapalika news : महापालिका निवडणुकीचे बिगुल दहा दिवसात वाजणार,  जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यात होणार मतदान

SHARE:

mahapalika news : महापालिका निवडणुकीचे बिगुल दहा दिवसात वाजणार,  जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यात होणार मतदान : राज्यातील अनेक जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याने नव्याने आरक्षण प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात महापालिकांच्या निवडणुका जाहीर करण्याच्या हालचाली राज्य निवडणूक आयोगाने सुरू केल्या आहेत. मनपाची अंतिम मतदार यादी 10 डिसेंबरला प्रसिध्द होणार आहे, तर राज्य अधिवेशन 14 डिसेंबरला समाप्त होणार आहे.

mahapalika news : महापालिका निवडणुकीचे बिगुल दहा दिवसात वाजणार,  जानेवारीच्या पहिल्या पंधरावड्यात होणार मतदान

त्यामुळे येत्या दहा ते बारा दिवसात महापालिकेच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार असून जानेवारीच्या पहिल्या 15 दिवसात मतदान पार पडणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ओबीसी आरक्षण व प्रभाग रचना यामुळे गेल्या तीन वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रखडल्या होत्या. मात्र सर्वोच्च न्यायालयाने जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाकडून कार्यवाही केली जात आहे.

राज्य निवडणूक आयोगाने पहिल्या टप्प्यात राज्यातील नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. दुसर्‍या टप्प्यात जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका जाहीर करण्याचा प्लॅन केला होता. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशामुळे निवडणुकांमध्ये बदल होणार आहे. राज्यातील 40 नगरपालिका, 17 नगरपंचायती, 2 महापालिका, 17 जिल्हा परिषद तर 84 पंचायत समित्यांची आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवर गेली आहे.

त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने नाराजी व्यक्त केली होती. सध्या नगरपालिका व नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या, काही ठिकाणी दि. 20 मतदान होत आहे. यात न्यायालयाने हस्तक्षेप केला नाही. पण एकूण 32 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीमध्ये 50 टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण असा कामा नये, असे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यामुळे 32 पैकी 17 जिल्हा परिषदेमध्ये नव्याने आरक्षण प्रक्रिया राबवावी लागणार आहे.

याला साधारण एक महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. जानेवारीमध्ये या निवडणुका पार पडतील, असे बोलले जात आहे. त्यापूर्वी राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुका लावण्याची तयारी सुरू केली आहे.

नागपूर व चंद्रपूर महापालिकेमध्ये आरक्षण मर्यादा 50 टक्क्यांवर गेली आहे. मात्र न्यायालयाकडून या संदर्भात आक्षेप घेतला नाही. त्यामुळे दुसर्‍या टप्प्यात राज्यातील 29 महापालिकांच्या निवडणुकीचा कार्यक्रम लागण्याची शक्यता आहे. महापालिकेची सध्या प्रारूप मतदार यादी जाहीर झाली आहे.

या यादीवर हरकती घेण्याची मुदत दि. 3 डिसेंबरची होती. ही मुदत संपली आहे. आता आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन दि. 10 डिसेंबरपर्यंत अंतिम मतदार यादी तयार केली जाणार आहे. त्यामुळे महापालिकेची सर्व निवडणुकीची प्रक्रिया दि. 10 डिसेंबरला पूर्ण होईल. तर राज्य विधीमंडळाचे अधिवेशन हिवाळी अधिवेशन एक आठवड्याचे होणार असून, त्याची तारीख जाहीर केली आहे. दि. 8 ते 14 डिसेंबरपर्यंत हे अधिवेशन होणार आहे.

अधिवेशन संपल्यानंतर म्हणजे दि. 15 किंवा 16 डिसेंबरला राज्यात महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजण्याची शक्यता आहे. डिसेंबरच्या तिसर्‍या आठवड्यात अर्ज दाखल तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात प्रचाराला सुरूवात होऊन दि. 15 ते 20 डिसेंबरला मतदार होण्याची शक्यता देखील वर्तविली जात आहे. त्यामुळे आता महापालिकेच्या निवडणुकीला रंग चढणार आहे.

10 डिसेंबरपर्यंत हरकती निघालात काढा; आज बैठक

राज्य निवडणूक आयोगाने 29 महानगरपालिकांच्या आयुक्तांची बैठक बोलावली आहे. या बैठकीत महापालिकांमध्ये निवडणुकीची कितपत तयारी झाली, याचा आढावा घेतला जाणार आहे. तसेच प्रारूप मतदार यादीवर ज्या हरकती आल्या असतील त्यांना दि. 10 डिसेंबरपर्यंत उत्तरे देऊन टाकावीत, असे निर्देश राज्य निवडणूक आयोगाकडून महापालिका आयुक्तांना दिले जाण्याची शक्यता आहे.

असा असू शकतो संभाव्य कार्यक्रम

* आचारसंहिता जाहीर- दि. 15 ते 17 डिसेंबर
* अर्ज दाखल करणे- 22 ते 30 डिसेंबर
* छाननी व अर्ज माघार- जानेवारीचा पहिला आठवडा
* मतदान- 15 ते 20 जानेवारी

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *