ashta election news : आष्टा नगरपालिका ’मतदार’ राड्यानंतर स्ट्राँग रुमची जयंत पाटलांनी केली पाहणी

SHARE:

ashta election news : आष्टा नगरपालिका ’मतदार’ राड्यानंतर स्ट्राँग रुमची जयंत पाटलांनी केली पाहणी : प्रशासनाने काल दिलेली आकडेवारी आणि आज ऑनलाईक सादर केलेली आकडेवारी यामध्ये तफावत आढळल्याने आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्यने मतदार, कार्यकर्ते आणि पदाधिकारी जमले. झालेलं मतदान आणि निवडणूक आयोगाच्या यादीवरील नोंदीत तफावत असल्याचं सर्वांचं म्हणणं होतं. या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तथा आमदार जयंत पाटील यांनी आष्टा येथे जाऊन स्ट्राँग रुमची पाहणी केली.

ashta election news : आष्टा नगरपालिका ’मतदार’ राड्यानंतर स्ट्राँग रुमची जयंत पाटलांनी केली पाहणी

कोर्टाच्या निर्णयामुळे तब्बल 18 दिवस ईव्हीएम (एतच्) मतदान पेट्या सांभाळून ठेवणे, तेथील सुरक्षा व्यवस्थाचा चोख बंदोबस्त करणे हे जिल्हा प्रशासन, निवडणूक आयोग आणि पोलिसांपुढे मोठं आव्हान आहे. आष्टा नगरपरिषदेच्या ईव्हीएम स्ट्राँगरुमबाहेर मोठ्या संख्यने कार्यकर्ते जमले होते.

काल झालेल्या आष्टा नगर परिषदेमधील मतदानात आणि प्रशासनाने जाहीर केलेल्या मतदानात तफावत असल्याचा आरोप मतदार व आघाडीच्या पदाधिकार्‍यांनी केला. प्रशासनाने रात्री दिलेल्या आकडेवारीत आणि सकाळी ऑनलाईन जाहीर केलेल्या आकडेवारीत जवळपास दोन हजार मतांची वाढ असल्याचा आरोपही आष्टा शहर विकास आघाडीच्या लोकांनी केला.

आमदार जयंत पाटील यांनी ईव्हीएम आणि मतदान आकडेवारी संदर्भात आढावा घेतला. यावेळी, आष्टा येथील मतदान प्रक्रियेनंतर ज्या ठिकाणी ईव्हीएम मशीन ठेवल्या आहेत, त्या स्ट्राँग रुममध्ये जाऊन पाटील यांनी पाहणी करत सुरक्षेसंदर्भात माहिती घेतली.
स्ट्राँग रुमबाहेर एलसीडीद्वारे प्रक्षेपण करण्याची मागणी

महाराष्ट्रातील सर्वच मतदान केंद्र आणि ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँग रुमच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्ही ठिकाणी कॅमेरे लावावेत. तसेच, रुमच्या बाहेर एक मोठा डिस्प्ले एलसीडीच्या माध्यमातून उभारण्यात यावा, तो जनतेसमोर ठेवावा, अशी मागणी आमदार जयंत पाटील यांनी केली आहे. दरम्यान, जयंत पाटील दाखल झाल्यानंतर काही पदाधिकार्‍यांनी गेटमधून आत घुसण्याचा प्रयत्न केला होता.

मात्र, पोलीस आणि सुरक्षा जवानांनी जमावाला बाहेरच रोखले, गेट लावून त्यांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला. त्यामुळे, नागरिकांनी संताप व्यक्त केल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता.

आष्टा नगर परिषदेमध्ये आमदार जयंत पाटील, वैभव शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आष्टा शहर विकास आघाडी स्थापन करण्यात आली ज्याचे विशाल शिंदे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते, तर अजित पवार राष्ट्रवादी-महायुतीकडून प्रवीण माने हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते. आष्टा नगर परिषदेत निवडणूक प्रशासनाकडून रात्री देण्यात आलेल्या आकडेवारीमध्ये झालेले मतदान 22,864 इतके होते.

मात्र, ऑनलाईन अपलोड झालेले मतदान 24,913 इतके होते. एकूण 2 हजार 49 मतदान वाढल्याचा आरोप आष्टा शहर विकास आघाडीकडून करण्यात आला आणि स्ट्राँग रुम बाहेर पदाधिकारी जमा झाले. मतदान वाढल्याचा आक्षेप घेत शरद पवार राष्ट्रवादी, उबाठा शिवसेना, शिंदे शिवसेना, अपक्ष उमेदवार स्ट्राँग रुम बाहेर जमा झाले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *