techears news : शाळा बंद ठेवून टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर

SHARE:

techears news : शाळा बंद ठेवून टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर : जिल्ह्यातील हजारो शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी महामोर्चाच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. टीईटीसह शासनाच्या एकूणच शैक्षणिक धोरणाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. शिक्षक संघटनाच्या पदाधिकार्‍यांनी व उपस्थित लोकप्रतिनिधींनी शासनाच्या एकूणच शिक्षण धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले.

techears news : शाळा बंद ठेवून टीईटी विरोधात शिक्षक रस्त्यावर

हजारो शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी सहभागी, जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

पंचवीस-तीस वर्षे शिक्षण दानाचे काम केले. अनेक विद्यार्थी घडवले. त्यामधीलच अनेक शिक्षक आयएएस, आयपीएस अधिकारी झाले. उच्च उद्या विभूषित झाले आणि आता पुन्हा आम्ही आमची पात्रता सिद्ध करायला लावणे हे शासनाचे धोरण योग्य नाही. टीईटीची सक्ती रद्द झालीच पाहिजे, शिक्षण व्यवस्थेवरील संकट दूर करून सर्वांना मोफत व हक्काचे शिक्षण मिळाले पाहिजे, गोरगरिबांचे शिक्षण व शाळा जिवंत राहिल्या पाहिजेत.

जिल्ह्यातील सर्व शिक्षक संघटना, शिक्षण संस्थांच्या सांगली जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापासून शिक्षकांच्या मूक मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात शिक्षक-शिक्षिका तसेच शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षण संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झालेे. जिल्हा शैक्षणिक व्यासपीठच्यावतीने विविध मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले.

सर्वोच्च न्यायालयाच्या टीईटी विषयक अनिवार्यतेच्या निर्णयास अनुसरून प्राथमिक शिक्षकांना संरक्षण देण्यासाठी पुनर्विचार याचिका दाखल करण्यास होत असलेली विलंब प्रक्रिया, तसेच शिक्षण विभागाकडून निकालाचा चुकीचा अर्थ घेऊन सुरू असलेली कार्यवाही यामुळे राज्यातील शिक्षकवर्गामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला आहे. राज्यातील प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, मुख्याध्यापक, संस्थाचालक तसेच शिक्षकेतर कर्मचारी यांच्या विविध संघटनांचा समावेश आंदोलनात होता.

पदवीधर मतदारसंघाचे आमदार अरुण लाड यांनी आंदोलन स्थळी सहभागी होत शिक्षकांच्या या आंदोलनाला जाहीर पाठिंबा दिला. शासनाने याबाबत तात्काळ भूमिका घेऊन शिक्षण संस्था शाळा तसेच शिक्षकांच्या बाबतीतील प्रलंबित प्रश्न तात्काळ मार्गी लागावेत अशी मागणी केली. माजी आमदार भगवानराव साळुंखे यांनी शासनाचा शैक्षणिक खर्च कमी होत आहे. हा खर्च पावणेदोन टक्केवर आला आहे. शिक्षण वाचवा देश वाचवा हे अभियान सुरु केले सून देशातील 400 जिल्हाधिकार्‍यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवेदन देणार असल्याचे सांगितले.

यावेळी शिक्षक संघटनेच्यावतीने शिक्षक समितीचे राज्य कार्याध्यक्ष सयाजीराव पाटील, सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाचे अध्यक्ष विनायक शिंदे, महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे सांगली जिल्हा अध्यक्ष अमोल शिंदे, महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण संघाचे राज्य पदाधिकारी अविनाश गुरव, शिक्षक समितीचे राज्य पदाधिकारी बाबासाहेब लाड, शिक्षक भारती उर्दू विभागाचे राज्याध्यक्ष मुस्ताक पटेल, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष माणिक पाटील, शिक्षक संघ (शि.द. पाटील गटाचे) जिल्हाध्यक्ष अमोल माने आदींनी मनोगत व्यक्त केले.

शिक्षक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अरविंद जैनापुरे, खाजगी शिक्षक महासंघाचे अरविंद गावडे, बापू दाभाडे, शिक्षक भारती जिल्हाध्यक्ष सुधाकर माने, मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष एस.एस.झांबरे, पदवीधर संघटना जिल्हाध्यक्ष उत्तम इंगळे, शिक्षक बँकचे माजी चेअरमन यू.टी.जाधव, कास्ट्राईब शिक्षक महासंघ जिल्हाध्यक्ष प्रमोद काकडे,शिक्षक संघाचे शब्बीर तांबोळी, राहुल पाटणे,रमेश पाटील, शिवाजी पवार, स्वप्निल मंडले, नामदेव पाटील, सचिन इंगोले, टी.के. जावीर, एस.टी.नाईक, सुनिल गुरव,जयश्री कुंभार, नूतन परीट, स्वाती चौगुले, शोभा शिंदे, शुभांगी पाटील, रुपाली गुरव, शितल भोसले यांच्यासह अनेक संघटनांचे पदाधिकारी व शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व शाळा बंद ठेवून शिक्षक शिक्षिका मोर्चामध्ये सहभागी झाले होते.

प्रास्तविक शिक्षक संघटना समन्वय समितीचे जिल्हा सरचिटणीस अमोल माने यांनी केले तर आभार जिल्हा शैक्षणिक व्यासपीठाचे सचिव राजेंद्र नागरगोजे यांनी मानले.

शिक्षक आंदोलनात नेते मंडळींची हजेरी

पदवीधर मतदारसंघाचे आ. अरुण लाड, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक वैभव शिंदे, मध्यवर्ती राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचे नेते डी.जी. मुलाणी, पुणे विभागाचे पदाधिकारी पी एन काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, वंचित बहुजन आघाडीचे नितिन सोनवणे आदी मान्यवरांनी आंदोलनास उपस्थित राहून शिक्षकांच्याही आंदोलनास पाठिंबा दिला.

शिक्षकांच्या मागण्या पुढीलप्रमाणे…

टीईटी निर्णयावरील पुनर्विचार याचिका तातडीने दाखल करावी. टीईटी निकालाचा चुकीचा अर्थ काढून विविध कार्यालयांकडून सुरू असलेली कार्यवाही तात्काळ थांबवावी, जुनी पेन्शन योजना लागू करावी. शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित वेतनश्रेणी लागू करावी. दहा, वीस व तीस वर्षांनंतरची सुधारित तीन वेतन लाभाची आश्वासित प्रगती योजना लागू करावी. 15 मार्च 2024 चा संचमान्यता विषयक शासन निर्णय रद्द करावा. राज्यातील शिक्षकेतर कर्मचार्‍यांची बंद असलेली पदभरती तात्काळ सुरू करावी. शिक्षकांवरील विविध अशैक्षणिक व ऑनलाइन उपक्रम तात्काळ थांबवावेत.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *