karad news : कराडमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षांची पाटी

SHARE:

karad news : कराडमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षांची पाटी : कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदासाठी यशवंत विकास आघाडी आणि लोकशाही आघाडीतर्फे माजी उपनगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव हे उमेदवार म्हणून निवडणुक रिंगणात होते. येथील नगरपालिकेच्या मतदानाचा निकाल 21 डिसेंबरला जाहीर होणार आहे. तत्पुर्वीच त्यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यपदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली होती.

karad news : कराडमध्ये निकाल जाहीर होण्यापूर्वीच नगराध्यक्षांची पाटी

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वात मोठी नगरपालिका म्हणून कराडचा उल्लेख होतो. या नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी तब्बल नऊ वर्षानंतर निवडणूक झाली. त्यामुळे यावेळी निवडणुक ही रंगतदार झाली. यावेळी निवडणुक आयोगाने जारी केलेल्या निवडणुक कार्यक्रमाप्रमाणे उमेदवारांना चिन्ह मिळाल्यानंतर प्रचाराला अवघेच पाचच दिवस मिळाले. त्यामुळे नेत्यांसह उमेदवारांनी पायाला भिंगरी लावुन मतदारांपर्यत पोहचण्याचा प्रयत्न केला.

यावेळच्या निवडणुकीत भाजपचे नेते आमदार डॉ. अतुल भोसले यांनी कमळाच्या चिन्हावर तर आणि काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी हाताच्या पंजावर उमेदवार उभे केले. तर माजी सहकारमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील यांची लोकशाही आघाडी आणि माजी उपनगराध्यक्ष राजेंद्र यादव यांची यशवंत विकास आघाडी यांनी एकत्रीतपणे निवडणुक लढवली. त्या दोन्ही आघाडीचे यादव हे नगराध्यक्षपदाचे उमेदवार होते.

शहरातील 15 ब प्रभागातील मतदान 20 डिसेंबरला होणार आहे तर 21 डिसेंबरला सर्व मतदानाची एकत्रीत मोजणी होणार आहे. त्याची उत्सुकता सर्वांना लागुन आहे. मात्र तत्पुर्वीच लोकशाही आघाडी आणि यशवंत विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार राजेंद्र यादव यांच्या समर्थकांनी त्यांच्या नावाची लोकनियुक्त नगराध्यपदाची पाटी तयार करुन ती काहीकाळ त्यांच्या कार्यालयात ठेवली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *