kupwad murdar news : कुपवाडमध्ये भरदिवसा तरुणाचा कुकरीने निर्घृण खून

SHARE:

तीन ठिकाणी पाठलाग करत वार : संशयित चौघे हल्लेखोर ताब्यात, एका अल्पवयीन मुलाचाही समावेश.

kupwad murdar news : कुपवाडमध्ये भरदिवसा तरुणाचा कुकरीने निर्घृण खून : शहरातील कुपवाड पोलिस ठाण्याच्या हद्दीतील अहिल्यानगर परिसरात आज भर दुपारी सिनेस्टाइल खुनाची घटना घडली. जुन्या वादाच्या रागातून एका तरुणाचा तीन ठिकाणी पाठलाग करून त्याच्या चेहर्‍यावर, मानेवर आणि डोक्यात कुकरीने वार करून निर्घृण खून केला.

kupwad murdar news : कुपवाडमध्ये भरदिवसा तरुणाचा कुकरीने निर्घृण खून

सदर खुनाची घटना हि आज शुक्रवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास घडली. विनायक उर्फ राहुल सुनिल कदम (वय 22 वर्ष, रा. माधवनगर झोपडपट्टी, कुपवाड) असे मृत तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच अपर अधीक्षक, उपअधीक्षक यांच्यासह तीन पोलिस ठाण्याच्या प्रभारींनी फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली होती.

या खून प्रकरणी रमेश मुकेश जाधव (वय 19) , विनायक उत्तम सूर्यवंशी (वय 21 रा.दोघे अहिल्यानगर झोपडपट्टी, कुपवाड), निखिल अनिल यादव, वय 21 रा. चिंतामणनगर सांगली.) यांच्यासह एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

पोलिसांनी व घटनास्थळावरून मिळलेल्या माहितीनुसार : मयत विनायक उर्फ राहुल कदम व विनायक सूर्यवंशी हे दोघे मित्र होते. काही दिवसापूर्वी दोघांत किरकोळ भांडण झाले होते . त्यामुळे दोघांमध्ये खुन्नसने बघणे असा प्रकार चालू होता त्यावेळी कदम याने सूर्यवंशीला ’’तुला 2026 बघू देत नाही’’ असे बोलल्याचे घटनास्थळावरून समजते.

या झालेल्या पूर्वीच्या वादावादीचा राग मनात धरून शुक्रवारी अहिल्यानगर येथील संजय इंडस्ट्रीज परिसरात एका पिठाच्या गिरणी समोर विनायक सूर्यवंशी व त्याच्या साथीदाराणी राहुल याला अडवून तोंडावर, डोक्यात, गळ्यावर धारदार धारदार शास्त्राने व कुकरी सारख्या चाकूने वर्मी घाव घातले.तो रक्ताने माखलेल्या गंभीर जखमी अवस्थेत जीव वाचविण्यासाठी एका घराच्या दिशेने पळाला .

गंभीर जखमी अवस्थेत नातेवाईकानी त्याला दवाखान्यात घेऊन जात असताना संशयित मारेकर्‍यांनी पाठलाग करत त्याच्यावर धार धार शस्त्राने वर्मी घाव घातले.तो रक्ताच्या थारोळ्यात पडल्याचे दिसताच संशयितानि पलायन केले.
घटनेची माहिती मिळताच कुपवाड पोलिस ठाण्याचे सहा.पोलिस निरीक्षक आनंदराव घाडगे व संजयनगर पोलीस ठाणेचे पोनि सतिश कदम पोलिस पथकासह घटनास्थळी दाखल झाले.घटनेचा पंचनामा करून संजयनगर व कुपवाड पोलिसांचे पथक संशयितांच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.

संजयनगर पोलीस पथकातील पोहेकॉ.साळुंखे यांना गोपनीय बातमी मिळाली की, संशयित हे गोसावी गल्ली येथील पाण्याचे टाकीजवळ थांबले आहेत. पोलिसांनी तत्काळ धाव घेत त्यांना ताब्यात घेवून संजयनगर पोलीस ठाणेस आणून त्यांचेकडे घडलेल्या घटनेबाबत चौकशी केली असता त्यांनी सदर गुन्हा केलेचे निष्पन्न झाले आहे. घटनास्थळी श्वान पथक, फॉरेन्सिक लॅबचे पथक दाखल झाले. घटनास्थळी अप्पर पोलिस अधीक्षक कल्पना बारवकर, उपविभागीय अधिकारी प्रणिल गिल्डा,

स्थानिक गुन्हेचे संजीवकुमार झाडे, विश्रामबागचे सुधीर भालेराव, सांगली ग्रामीणचे भैरवनाथ तळेकर आदींनी धाव घेतली. सदर घटनेची कुपवाड पोलिसात नोंद झाली असून घटनेचा अधिक तपास कुपवाड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आनंदराव घाडगे हे करीत आहेत.या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *