ashta election news : आष्टा, शिराळा, आटपाडीचा निकाल लवकर लागणार: जिल्ह्यातील सहा नगरपरिषद व दोन नगर पंचायत निवडणूकीची मतमोजणी रविवारी (दि. 21) होत आहे. मतमोजणीची तयारी पूर्ण केली असुन प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. आठही पालिकांच्या मतमोजणीसाठी 746 अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
ashta election news : आष्टा, शिराळा, आटपाडीचा निकाल लवकर लागणार
प्रशासकीय तयारी पूर्ण, 746 कर्मचारी नियुक्त
एकूण शंभर टेबलांवर ही मतमोजणी होत आहे. दोन ते सहा मतमोजणीच्या फेर्या होतील. आष्टा नगरपालिकेचा तीन शिराळा व आटपाडी नगरपंचायतीचा दोन फेर्यात तर ऊरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या सर्वाधिक सहा फेर्यात निकाल जाहीर होईल. दुपारी बारापूर्वीच सर्व निकाल स्पष्ट होतील, असे संकेत आहेत.
राज्यातील काही नगरपालिका व नगरपरिषदांची निवडणूक लांबल्याने जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपरिषदांचा लांबलेला निकाल आता जवळ आला आहे. निकालासाठी उमेदवारांसह मतदारांनाही तब्बबल अठरा दिवस प्रतिक्षा करावी लागली आहे. अखेर मतमोजणीचा दिवस जवळ आला असून रविवार (दि. 21) रोजी मतमोजणी होणार आहे. जिल्ह्यातील उरुण ईश्वरपूर, विटा, आष्टा, तासगाव, जत व पलूस या सहा नगरपरिषदा तसेच शिराळा व आटपाडी या दोन नगरपंचायतींसाठी 2 डिसेंबररोजी मतदान घेण्यात आले.
नगराध्यक्षपदाच्या आठ जागांसाठी 41, तर नगरसेवकपदाच्या 180 जागांसाठी 590 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शिराळा येथील प्रभाग चारमधील निवडणूकसंदर्भातील वाद निर्माण झाल्यामुळे ती स्थगित करण्यात आली. यासाठी आता शनिवार, दि. 20 डिसेंबररोजी मतदान घेण्यात येत आहे. यासाठी यापूर्वी झालेल्या मतदानाची मतमोजणी आता रविवारी सकाळी 10 वाजल्यापासून करण्यात येणार आहे. सर्व निकाल दुपारपर्यंत अपेक्षित आहेत.
नगरपालिका आणि नगरपरिषदेसाठी 2 लाख 57 हजार 977 मतदारांपैकी प्रत्यक्षात 1 लाख 95 हजार 952 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला. मतदानाची टक्केवारी 75.96 टक्के इतकी आहे. आष्टा नगरपालिकेचा तीन शिराळा व आटपाडी नगरपंचायतीचा दोन फेर्यात निकाल जाहीर होईल. ऊरुण ईश्वरपूर नगरपालिकेच्या सर्वाधिक सहा फेर्या होणार आहेत. त्यामुळे या निकालासाठी वाट पहावी लागणा असल्याचे चित्र आहे.
जिल्हा प्रशासनाकडून मतमोजणीसाठी 746 अधिकारी, कर्मचार्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना दोन सत्रात प्रशिक्षण देण्यात आले आहे. मतमोजणीच्या एकूण फेर्या 27 होणार आहेत. दोन ते सहा फेर्यात मतमोजणी होत आहे. मतमोजणीसाठी 100 टेबल मांडण्यात आले आहेत. आतापर्यंत 104 टपाली मतपत्रिका प्राप्त झाल्या आहेत. यासाठी सहा टेबल ठेवण्यात आले आहेत.
नगरपालिका कर्मचारी टेबल फेर्या
ईश्वरपूर 100 15 6
विटा 113 13 4
आष्टा 72 13 4
तासगाव 108 12 3
जत 90 12 3
पलूस 90 12 3
शिराळा 93 14 2
आटपाडी 80 14 2
मतमोजणीची ठिकाणे
ईश्वरपूर- वाळवा तहसील कार्यालय,
विटा- बळवंत महाविद्यालय, विटा,
आष्टा – विलासराव शिंदे हॉल, आष्टा,
तासगाव – तहसील कार्यालय, तासगाव,
जत -जुने धान्य गोदाम, जत,
पलूस – तहसील कार्यालय, पलूस,
शिराळा – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत,
आटपाडी – मध्यवर्ती प्रशासकीय इमारत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











