sangli election news : भाजपकडून माजी नगरसेवकांना दणका : महापालिका निवडणुकीसाठी भाजपकडून उमेदवारी यादीवर शिक्कामोर्तब झाले असले तरी अद्याप अधिकृत यादी जाहीर झालेली नाही. तिकीट निश्चित झालेल्या उमेदवारांना निरोप देण्यात आला आहे. विनिंग मेरीटचा निकष लावत काही माजी नगरसवेकांसह पक्षाच्या निष्ठावंताचेही तिकीट कापण्यात आले आहे. नऊ माजी नगरसेवकांसह प्रबळ दावेदार असलेल्या उमेदवारांचा पत्ता कट करण्यात आला आहे.
sangli election news : भाजपकडून माजी नगरसेवकांना दणका
नऊ माजी नगरसेवकांसह प्रबळ दावेदारांचा पत्ता कट
भाजपने अद्याप अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर केली नसली तरी जे उमेदवारी पक्षांकडून अंतिम होणार आहेत. त्यांना फोन करून अर्ज भरण्यास निरोप देण्यात आला आहे. त्यामुळे भाजपचे जवळपास सर्व ठिकाणचे उमेदवार निश्चित झाले असल्याचे स्पष्ट झाले. भाजपचे माजी नगरसेवक असलेले माजी उपमहापौर युवराज बावडेकर, माजी गटनेते विनायक सिंहासने, भारती दिगडे, अनारकली कुरणे, कल्पना कोळेकर, राजेंद्र कुंभार, अप्सरा वायदंडे, सोनाली सगरे, सुनंदा राऊत यांचा उमेदवारी यादीत समावेश करण्यात आलेला नाही. .
याशिवाय उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानले जात असलेल्या विश्वजीत पाटील, अमोल गवळी, रौनक शहा, पूजा खांडेकर, सुजित काटे, नितीन शिंदे, आशा शिंदे, सुजित राऊत, दरीबा बंडगर यांचाही यादीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही. भाजपमध्ये आलेल्या काही काँग्रेसच्या नेत्यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यासाठी भाजपमधील निष्ठावांत पदाधिकारी, कार्यकर्त्यांना डावलण्यात आले आहे.
पक्षाने पत्ता कट केलेल्या बहुतांशी इच्छुकांनी निवडणुकीपूर्वी जोरदार तयारी केली होती.
कोणत्याही परिस्थितीत उमेदवारी मिळेल, असा दावाही करण्यात आला होता. मात्र ऐनवेळी उमेदवारी कापत दणका दिल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. यापैकी काही जणांनी विरोधी पक्षाशी हातमिळवणी करुन निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. पक्षाकडून अधिकृत उमेदवारी यादी जाहीर होताच बंडखोरी उफाळणार असल्याचे स्पष्ट संकेत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











