jaysingpur news : चिपरी येथील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी धाब्यामध्ये वेटरवर चाकूहल्ला

SHARE:

jaysingpur news : चिपरी येथील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी धाब्यामध्ये वेटरवर चाकूहल्ला : चिपरी (ता. शिरोळ) येथील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी धाब्यामध्ये दारू तसेच जेवण न दिल्याने हॉटेल मॅनेजरला मारहाण करण्याबरोबरच वेटरवर चाकू हल्ल्याची घटना घडली.

jaysingpur news : चिपरी येथील हिंदकेसरी न्यू विजय तंदुरी धाब्यामध्ये वेटरवर चाकूहल्ला

कुरूंदवाडच्या दोघाविरोधात गुन्हा दाखल

या हल्ल्यात वेटर गंभीर जखमी झाला आहे. सज्जन रमेश यादव (वय 25, रा. मध्यप्रदेश) असे त्याचे नाव आहे. याप्रकरणी जयसिंगपूर पोलिसांनी वेटर सज्ज्जन यादव याच्या फिर्यादीवरून राहुल किरण भबीरे, श्रीनिवास दुबगुंडी (दोघे रा. कुरुंदवाड, ता. शिरोळ) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

चिपरी हद्दीत चौंडेश्वरी फाट्यानजीक महादेव बाजीराव येवले (रा. चिपरी) यांचा हिंदकेसरी न्यू विजय तंदूरी धाबा आहे. 1 जानेवारी रोजी 2.30 च्या सुमारास राहुल भबीरे व इतरजण या धाब्यामध्ये गेले होते. राहुल भबीरे व त्याचेसोबत आलेले इतरजन कौंटरजवळ येऊन हॉटेलचे मॅनेजर रवींद्र येवारे यांच्याकडे दारू मागू लागले.

त्यावेळी येवारे यांनी दारूचा स्टॉक तसेच जेवण देखील संपल्याचे सांगितले. यावेळी भबीरे याने मॅनेजरच्या अंगावर धाऊन जात कानाखाली मारली. तर दुबगुंडी याने मॅनेजरला जेवण व दारू का नाही म्हणतोस, असे म्हणून दमदाटी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण करीत असताना, भबीरे याने कमरेला लावलेला चाकू काढून मॅनेजरला मारण्यासाठी अंगावर धाऊन आला.

त्यावेळी वेटर सज्जन यादव याने त्यास पाठीमागून पकडल्याने त्याच्या डाव्या हाताच्या दंडावर, पाठीवर व छातीवर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या फिर्यादीवरून पोलिसांनी भबीरे व दुबगुंडी या दोघाविरोधोत गुन्हा दाखल केला आहे. जयसिंगपूर पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *