miraj election news : मिरजेत काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार

SHARE:

miraj election news : मिरजेत काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार : मिरजेतील प्रभाग सातमध्ये अनुसूचीत जाती महिला उमेदवारीसाठी काँग्रेसने एबी फॉर्म माजी नगरसेविका शुभांगी देवमाने देण्यात आले होते. परंतु ऐनवेळी देवमाने यांनी माघार घेतल्याने काँग्रेसची गोची झाली आहे. काँग्रेसचा उमेदवारच कमी झाला. असल्याने आता तीन उमेदवारच निवडणुक रिंगणात आहेत.

miraj election news : मिरजेत काँग्रेस उमेदवाराची ऐनवेळी माघार

मिरजेत प्रभाग सात मधून शुभांगी देवमाने यांची माघार

प्रभात सात हा भाजपचा बाल्लेकिल्ला म्हणून समजला जातो. गत पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे पॅनेलच निवडून आले होते. यामध्ये शुभांगी देवमाने यांचे पती आनंदा देवमाने हे भाजपकडून निवडून आले होते. माजी महापौर म्हणून त्यांची वर्णी लागली होती. परंतु राजकीय समीकरणे बदलल्याने त्यांनी भाजप बरोबर फार्कत घेतली होती. त्यांनी भाजप मधून जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला होता.

त्यानंतर आनंदा देवमाने यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. काही दिवसानंतर त्यांनी परत स्वगृही जनसुराज्य शक्ती पक्षात प्रवेश केला. परंतु त्यांच्या पत्नी शुभांगी देवमाने यांची भूमिका तटस्त होती. प्रभाग सात मधून त्यांना काँग्रेसने एबी फॉर्म दिला. निवडणूक रिंगणातून माघार घेतल्याने काँग्रेसची गोची झाली आहे.

माजी नगरसेविका शुभांगी देवमाने या तुल्यबळ उमेदवार म्हणूूनच काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली होती. ऐनवेळी माघार घेवून राजकीय खळबळ उडवून दिली आहे. निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेवून कोणत्या पक्षाला ताकद देतात हे लवकरच स्पष्ट होईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *