sangli : सांगली महापालिकेत या ठिकाणी होणार काटा लढती : महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार पक्ष महाआघाडी व शिवसेना या प्रमुख पक्षांच्या उमेदवारांमध्ये काट्याची टक्कर होणार आहे. या शिवाय काही प्रभागात अपक्ष निवडणुकीच्या रिंगणात असल्याने काही राजकीय पक्षांना फायदा तर काहींना तोटा होण्याची देखील शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय गणिते आखली जात आहेत. अनेक प्रभागात काट्याची टक्कर असणार आहे.
sangli : सांगली महापालिकेत या ठिकाणी होणार काटा लढती
महापालिकेच्या निवडणुकीचे चित्र शुक्रवारी स्पष्ट झाले आहे. 78 जागांसाठी 381 उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. यामध्ये प्रामुख्याने काही ठिकाणी भाजप विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (अजितदादा) तर काही ठिकाणी भाजप विरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार पक्षात लढत होत आहेत. अनेक ठिकाणी लढती चांगल्याच रंगणार आहेत.
या निवडणुकीच्या माध्यमातून राजकीय नेत्यांची ताकद पणाला लागणार आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक एकमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून माजी उपमहापौर विजय घाडगे विरूध्द भाजपकडून ऋषिकेश सूर्यवंशी यांची लढत होत आहे.
यासह प्रभाग क्रमांक अकरामध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतिक पाटील व खा. विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील यांच्यासमोर भाजपकडून माजी नगरसेवक मनोज सरगर असणार आहेत. ही लढत लक्षवेधी असणार आहे. अख्या महापालिका क्षेत्राचे लक्ष या लढतीकडे लागले आहे. तर दुसरीकडे भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग हे प्रभाग क्रमांक दोनमधून उभे आहेत. त्यांना विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक गजानन मगदूम यांनी आव्हान दिले आहे. ही लढत देखील अटीतटीची असणार आहे. तर दुसरीकडे प्रभाग क्रमांक तीनमधून स्थायी समितीचे माजी सभापती संदीप आवटी यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिगंबर जाधव निवडणूक लढवत आहेत.
प्रभाग क्रमांक नऊमधून माजी नगरसेवक मनगू सरगर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भाजपकडून अतुल माने निवडणूक लढवत आहेत. जातीय समीकरणावर ही निवडणूक होण्याची शक्यता आहे. प्रभाग क्रमांक 14 मधून माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांना भाजपने उमेदवारी डावलली होती.
त्यामुळे त्यांनी ऐनवेळी शिवसेनेत प्रवेश करून उमेदवारी मिळवली आहे. त्यांनी भाजपचे विजय साळुंखे यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे. प्रभाग क्रमांक पंधरामधून माजी विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर भाजपकडून मैदानात उतरले आहेत. तर त्यांच्या विरोधात काँग्रेसकडून माजी नगरसेवक मयूर पाटील निवडणूक रिंगणात आहेत.
प्रभाग क्रमांक वीसमध्ये चुरशीने निवडणूक होणार आहे. या प्रभागात भाजपकडून योगेंद्र थोरात निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसकडून माजी नगरसेवक अतहर नायकवडी तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून अभिजीत हारगे निवडणूक लढवत आहेत. महापालिकेच्या निवडणुकीसाठी आता बारा दिवस बाकी आहेत. या काळात अटीतटीचा प्रचार देखील होणार आहे. त्यामुळे महापालिका क्षेत्रातील या लढतीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या निवडणुकीत अपक्ष देखील मोठ्या प्रमाणात मैदानात आहेत. त्यामुळे अपक्षांची मते कोणाला तारणार व कोणाला मारक ठरणार हे निवडणुकीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे.
या ठिकाणी होणार लक्षवेधी लढती…
प्रभाग उमेदवार उमेदवार
1 ऋषिकेश सूर्यवंशी (भाजप) विजय घाडगे (रा.श.प.)
2 प्रकाश ढंग (भाजप) गजानन मगदूम (राष्ट्रवादी)
3 संदीप आवटी (भाजप) दिगंबर जाधव (राष्ट्रवादी)
9 अतुल माने (भाजप) मनगू सरगर (रा.श.प.)
11 मनोज सरगर (भाजप) हर्षवर्धन पाटील (काँग्रेस)
14 विजय साळुंखे (भाजप) युवराज बावडेकर(शिवसेना)
16 उत्तम साखळकर (भाजप) मयूर पाटील (काँग्रेस)
20 योगेंद्र थोरात (भाजप), अतहर नायकवडी (राष्ट्रवादी) अभिजीत हारगे (रा.श.प.)
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











