miraj news : रेल्वे तिकीटामुळे लागला महिलेच्या खुनाचा छडा उत्तर प्रदेशातून बाप-लेकांना अटक

SHARE:

miraj news : रेल्वे तिकीटामुळे लागला महिलेच्या खुनाचा छडा उत्तर प्रदेशातून बाप-लेकांना अटक : उसाच्या फडात सडलेल्या स्थितीत आढळलेल्या महिलेच्या मृतदेहाजवळ आढळलेल्या केवळ रेल्वे तिकिटाच्या आधारे सांगली पोलीसांनी तपास करत खून प्रकरणी बापलेकांना उत्तर प्रदेशातून अटक केली. कोणतेही धागेदारे नसताना अथवा ठोस पुरावा हाती नसताना या गुन्ह्याचा छडा लावल्याबद्दल पोलीस अधिक्षक संदीप घुगे यांनी तपास पथकाचे कौतुक केले.

miraj news : रेल्वे तिकीटामुळे लागला महिलेच्या खुनाचा छडा उत्तर प्रदेशातून बाप-लेकांना अटक

याबाबत पोलीस अधिक्षक श्री. घुगे यांनी रविवारी पत्रकार बैठकीत माहिती दिली. मिरजेपासून पाच किलोमीटर अंतरावर टाकळी गावच्या हद्दीत एका उसाच्या शेतात महिलेचा सडलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. या महिलेचा गळा दाबून खून करण्यात आला होता. या प्रकरणी मृताचा पती आकाश उर्फ विशाल दीनदयाळ यादव (वय 24) आणि त्याचे वडिल दीनदयाळ यादव (वय 55 दोघेही रा. खुज्झी, ठाणा चन्दवक, जि. जैनापूर, उत्तर प्रदेश) या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे.

मृत महिलेचा छिन्न विछिन्न देह दि. 23 डिसेंबर रोजी उसाच्या शेतात आढळला होता. या महिलेच्या चेहर्याचा व छातीचा भाग प्राण्यांनी लचके तोडल्याने विद्रुप झाला होता. यामुळे ओळख पटविण्यात अडचणी निर्माण झाल्या होत्या. पेहराव स्थानिक वाटत नव्हता. या दरम्यान, आसपास महिला बेपत्ता असल्याची कोणतीही नोंद दिसत नव्हती. मात्र, या मृतदेहाजवळ पुणे ते मिरज हे रेल्वे तिकीट आढळले.

केवळ रेल्वे तिकिटाचा आधार घेत मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याचे व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने शोध मोहिेम राबवली. पुणे व मिरज रेल्वे स्थानकावर चौकशी केली असता या तिंघांना टाकळीजवळ सोडणारा रिक्षावाला मिळाला. त्याच्याकडून मिळालेल्या माहितीनुसार संबंधितांकडे पैसे संपल्याने त्यांनी एका चिक्की विके्रत्याच्या माध्यमातून ऑनलाईन तीन हजार रूपये घेतल्याचे समजले. या आधारे तांत्रिक तपास करत संशयिताजवळ पोलीस पोहचले.

या खूनामागील कारणाचा शोध घेतला असता मृत महिलेचे नाव नितू उर्फ शालिनी आकाश यादव असे होते. तिने पती व सासरच्या लोकाविरूध्द पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर तडजोड होउन महिला नांदण्यासाठी पतीकडे आली होती. यानंतर पती व सासरा दुसरीकडे राहण्यासाठी म्हणून महिलेला सोबत घेउन रेल्वेने मिरजेत आले होते.

यानंतर रिक्षातही या तिघांमध्ये वादावादी सुरू होती असे रिक्षाचालकांने सांगितले.या वादातच महिलेचा दोघांनी अंगावर असलेल्या शालने गळा आवळून खून केला व प्रेत उसाच्या फडात सोडून दोघेही आपल्या गावी परतले होते.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *