kavtemankhal crime news : कवठेमहांकाळचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला : भांडण सोडविल्याचा राग मनात धरून कवठे महांकाळ पंचायत समितीचे माजी उपसभापती अनिल शहाजी शिंदे ( वय 49) यांच्यावर त्यांच्या घाटनांद्रे येथील घरासमोर कोयत्याने प्राणघातक हल्ला चढविला. हा हल्ला मंगळवार दि. 6 जानेवारी रोजी सुरु रात्री दीड वाजण्याच्या सुमारास झाला.
kavtemankhal crime news : कवठेमहांकाळचे माजी उपसभापती अनिल शिंदे यांच्यावर प्राणघातक हल्ला
या हल्ल्यात अनिल शिंदे जखमी झाले आहेत. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात आठ जनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस ठाण्यात शिवम सुनिल शिंदे ,अमोल बबन खाडे, अविनाश बबन खाडे ,अक्षय बाळासो दबडे, अविनाश बाळासो दबडे ,अक्षय दादासो जाधव, निलेश अनिल जाधव ,नासिर जावेद मणेर सर्व रा.घाटनांद्रे ता.कवठेमहाकाळ या आठ जनाविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांकडून समजलेली माहिती अशी की, रात्री दीड वाजण्याच्या सुमारास घाटनांद्रे गावा मध्य भागी देवालयानजिक अनिल शिंदे हे परिवारासह घरात झोपले होते. जमावाने घरी झोपले असताना घराची बेल वाजवून आरोपी शिवम सुनिल शिंदे व अक्षय बाळासाहेब दबडे यांनी फिर्यादीस बाहेर बोलावन काल फिर्यीदी यांनी सोडबिलेल्या भांडणाच’ रांग मनात धरुन आरोपी अमोल बबन खाडे यांने त्याच्या हातातील कोयत्याने अनिल शिंदे यांच्या दोन्ही हाथावर मारुन जखमी केले.
आरोपीनी फिर्यादीस बेकायदेशीर जमाव जमवुन लाथाबक्यानी मारहान करुन् शिवीगाळ केली. आरोपीनी अनिल शिंदे मोटरसायकल गाडी व घराचा दरवाजा मोडुन नुकसान केले आहे. अनिल शिंदे यांनी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. घटनेची माहिती मिळताच कवठे महांकाळ पोलीस तातडीने घटना स्थळी दाखल झाले.
पोलीस निरीक्षक प्रवीणकुमार कांबळे यांच्या मार्गदर्शनानुसार सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल शिवशरण पुढील तपास करीत आहेत.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











