sangli election : प्रभाग 17 : भाजपाचा अभेद्य किल्ला विश्वास, विकास आणि विजयाची अमरगाथा

SHARE:

sangli election : प्रभाग 17 : भाजपाचा अभेद्य किल्ला विश्वास, विकास आणि विजयाची अमरगाथा ” सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणूक रणसंग्रामात काही प्रभाग फक्त निवडणूक जिंकण्यासाठी नसतात ते इतिहास, विश्वास आणि स्वाभिमानाचे प्रतीक असतात. असाच एक प्रभाग म्हणजे प्रभाग क्रमांक 17 – भाजपाचा अभेद्य, अजिंक्य बालेकिल्ला!

या प्रभागात निवडणूक म्हणजे केवळ मतांची मोजणी नाही, तर जनतेच्या विश्वासाचा उत्सव असतो. रस्त्यांवरून चालताना, गल्लीबोळात फिरताना, दुकानांत, घराघरांत एकच सूर ऐकू येतो – आपला प्रभाग, आपला पक्ष भाजप!
भाजपने या प्रभागात उतरवलेले चारही उमेदवार म्हणजे केवळ नावे नाहीत, तर लोकांच्या आयुष्यातील ओळखीची माणसं आहेत. सोशल इंजिनिअरिंगचा अचूक समतोल साधत निवडलेले हे चेहरे आज जनतेच्या मनात ठामपणे रुजले आहेत.

त्यातल्या त्यात प्रशांत पाटील

पहिल्यांदाच महापालिकेच्या रिंगणात उतरले, पण राजकारणात नवे असले तरी लोकांच्या हृदयात जुने! गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कोणताही दिखावा न करता, कोणताही गाजावाजा न करता ते लोकांच्या सुख-दुःखात सहभागी झाले. सोज्वळ चेहरा, साधी भाषा, माणुसकीचा स्पर्श – म्हणूनच आज प्रभाग 17 मध्ये त्यांचे नाव उच्चारले की चेहर्‍यावर आपोआप विश्वासाचे हास्य उमटते.

प्रभाग 17 म्हणजे सांगली शहराचा धडधडणारा ठोका. हा केवळ भौगोलिक मध्यवर्ती भाग नाही, तर विकासाचा केंद्रबिंदू आहे. गेल्या पाच वर्षांत येथे झालेले काम दिसणारे आहे, बोलणारे आहे, अनुभवता येणारे आहे. रस्ते रुंद झाले, पाणी नियमित झाले, नागरी सुविधा उभ्या राहिल्या, अंधार दूर झाला आणि या सगळ्यामागे होता भाजपाचा ठाम विकासाचा दृष्टिकोन.

केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या ताकदीने महापालिकेला मोठा निधी मिळाला. अनेक वर्षे प्रलंबित असलेली कामे मार्गी लागली. त्यामुळे हा प्रभाग आज अभिमानाने सांगतो – आम्ही विकास पाहिलाय अनुभवलेलाय!

प्रशांत पाटील, लक्ष्मण नवलाई, गीतांजली ढोपे-पाटील आणि मालन गडदे – ही चार नावे आज प्रभाग 17 मध्ये आश्वासन नाहीत, तर विश्वासाची हमी आहेत. त्यामुळेच आज वातावरण एकच सांगत आहे – चारही उमेदवार निवडून येणारच!

या प्रभागाची राजकीय परंपराही तेजस्वी आहे. शैलजा नवलाई – शहराच्या पहिल्या महापौर म्हणून इतिहास रचणार्‍या याच मातीतील नेत्या. मागील टर्ममध्ये गीता सुतार – सक्षम नेतृत्वाची साक्ष.

ही परंपरा सांगते की प्रभाग 17 ला केवळ सत्ता नको, तर दिशा देणारे नेतृत्व हवे असते आणि ते भाजपने नेहमीच दिले आहे.

आज स्पष्ट दिसते आहे – हा किल्ला अजून मजबूत झाला आहे. हा झेंडा अजून उंच फडकणार आहे.
आणि हा विश्वास अजून घट्ट होणार आहे. महापालिकेत भाजपाची सत्ता येणार हे आता अंदाज नाही, तर खात्री आहे.
आणि त्या सत्तेच्या सिंहासनावर बसणारा महापौर याच प्रभागातून असेल, ही आशा आज प्रत्येक कार्यकर्त्याच्या, प्रत्येक नागरिकाच्या मनात उजळून निघाली आहे.

प्रभाग 17 भाजपाचा होता आहे आणि राहणारच!
हा विजय मतपेटीत नाही, तो आधीच लोकांच्या हृदयात नोंदला गेला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *