kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या आमिषाने शेतकर्याची सात लाखाची फसवणूक : सण 2025-2026 या चालू गळीत हंगामासाठी ऊस तोडणी मजूर पुरविण्याचे अमिश दाखवून कवठेपिरान येथील एका शेतकर्याला 6 लाख 32 हजारांचा गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला. सदर फसवणुकीची घटना हि दि. 25 जून 2025 ते बुधवार दि. 07 जानेवारी 2026 या कालावधीत घडली. या प्रकरणी अनिकेत श्रीबाळ वडगावे (वय 32 रा. कवठेपिरान) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्या जळगाव जिल्ह्यातील दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे.
kavtepiran crime news : कवठेपिरानमध्ये ऊस तोडणी मजूर पुरवण्याच्या आमिषाने शेतकर्याची सात लाखाची फसवणूक
रवींद्र गिरधर भिल (वय 35), साजन संजय भिल (वय 27), अनिल रमेश भिल (वय 30), निलेश संजय भिल (वय 25), लक्ष्मण सुकलाल भिल (वय 41), अर्जुन रामकृष्ण भिल (वय 22), दिनेश नाना भिल (वय 25), अनिल सुरेश भिल (वय 30), नितीन संजय भिल (वय 32) आणि दीपक ज्ञानेश्वर भिल (वय 30 सर्व रा. अमळनेर जि. जळगाव) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी अनिकेत वडगावे हे आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील कवठेपिरान गावामध्ये राहतात. अनिकेत यांनी सन 2025-2026 या वर्षासाठी राजारामबापू सहकारी साखर कारखान्याशी ऊस तोडणी व वाहतूक करार केला होता.
संशयित दहा जणांशी दि. 25 जून 2025 रोजी जळगाव येथील वकिलांच्या कार्यालयात नोटरी ऊस तोडणी करार करून त्यांच्या मागणी प्रमाणे प्रत्येक कोयत्याला (एक जोडी) 55 हजार रुपये प्रमाणे वेळोवेळी रोख रक्कम आणि ऑनलाईन पेमेंट द्वारे एकूण 6 लाख 32 हजार 500 रुपये घेतले. यानंतर ऊस तोडणीच्या कामासाठी न येता तोडणी कराराचा भंग करून पैसे परत न देता फसवणूक केली.
घडलेल्या या प्रकारानंतर अनिकेत वडगावे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी फसवणूक करणार्या दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











