zare daroda news : सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत मोठा दरोडा 7 किलो सोने व 20 किलो चांदी पळविली

SHARE:

 

zare daroda news : सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत मोठा दरोडा 7 किलो सोने व 20 किलो चांदी पळविली : सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे झरे ता. आटपाडी येथील शाखेत बुधवारी मध्यरात्री चोरट्यानी खिडकीतून प्रवेश करून बँकेचा स्ट्राँग रूम मधील 22 लॉकर फोडून सात किलो सोने व वीस किलो चांदी ऐवज मोठी रोकड असा कोट्यावधींचा ऐवज लंपास झाल्याचा प्राथमिक अंदाज असून जिल्हा बँकेच्या इतिहासातील ही सर्वात मोठी चोरी आहे.

zare daroda news : सांगली जिल्हा बँकेच्या झरे शाखेत मोठा दरोडा 7 किलो सोने व 20 किलो चांदी पळविली

स्ट्रॉग रुम मधील 22 लॉकर फोडले :- जिल्हा बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

जिल्हा बँकेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह या दरोड्यामुळे नागरिकामधून उमठत आहे.आटपाडी पोलिसांकडून घटनास्थळी धाव तात्काळ तपास सुरु करण्यात आला आहे.झरे शाखेमधील सीसीटीव्ही,डीव्हीआर गायब,पुरावे केले नष्ट पोलिसांना थेट चेारट्यांचे आव्हान केले.पोलिस उपअधिक्षक कल्पना बारवकर,बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.रात्री उशिरापर्यत पंचनामा व गुन्हा नोंदवण्याचे काम सुरु होते.

चोरीची बातमी वा-यासारखी पसरताच बँक शाखेबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी झाली.आयुष्यभरांची पुंजी आणि दागिने चोरीला गेल्याने ग्राहकांमध्ये तीव्र चिंता व संतापाचे वातावरण होते.बॅकेच्या लॉकरमधील ठेवीच्या नुकसानभरपाईबाबत धोरण स्पष्ट नसल्याने लॉरधारक हवालदिल झाले आहेत.घटनेची माहिती मिळकताच आटपाडी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली ठसेतज्ज्ञ,स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा व श्वान पथकाच्या मदतीने तपास सुरु आहे.

परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. याबाबत अधिक माहिती अशी झरे ता.आटपाडी येथे स्टँड परिसरामध्ये तुकाराम नाना पडळकर यांच्या मालकीच्या इमारतीमध्ये भाड्याने बँकेची शाखा कार्यरत आहे.काल मध्यरात्रीनंतर चोरट्यांनी पूर्वेच्या दिशेला असणार्‍या खिडकीचे गज कापून बँकेमध्ये प्रवेश केला व गॅस कटरच्या साह्याने स्ट्राँग रूम मधील 22 लॉकर तोडले. त्यामध्ये ग्राहकांनी ठेवलेले सोने-चांदी व रोख रक्कम लंपास केली. ही बाब सकाळी बँकेच्या कर्मचार्‍यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी वरिष्ठांना सांगितले व त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली.

या घटनेची माहिती मिळतात बँकेच्या ग्राहकांनी शाखेत एकच गर्दी केली त्यानंतर पोलिसांनी तुटलेल्या लॉकरच्या मालकांना बोलवून चोरीस गेलेल्या दागिन्याचा तपशील गोळा करण्यास सुरुवात केली. यावेळी चोर ट्यांनी चोरी करताना पकडले जाऊ नये याची पूर्ण दक्षता घेतली असल्याचे दिसून आले.चोरी करताना हातमोजे वापरल्याची बाब पुढे आली असून शाखेत प्रवेश करताच चोरट्यानी सीसीटीव्ही बंद करून डीव्हीआर ताब्यात घेतला आहे.

या घटनेची माहिती मिळतात आटपाडी पोलिसांनी तातडीने हालचाली करून ठसे तज्ञ,स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखा यांना बोलवून तपास काम सुरू केले आहे. एक वर्षांपूर्वी या ठिकाणी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.दरम्यान घटनास्थळास आमदार गोपीचंद पडळकर, बँकेचे संचालक तानाजीराव पाटील, पोलीस उप अधीक्षक कल्पना बारवकर, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी वाघ यांच्यासह वरिष्ठ अधिकार्‍यांनी भेट दिली आहे.पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या मार्गदर्शनाखाली रात्री उशिरापर्यंत तपास काम व गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.

लॉकर मधील चोरी मुळे झालेले नुकसान व बँकेचे भरपाई बाबतचे धोरण माहित नसल्याने ग्राहकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरीची व्याप्ती पाहता सुमारे सात किलो सोने व 20 किलो चांदी तसेच रोख रक्कम असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

सीसीटीव्ही बंद,डीव्हीआर गायब : चोरट्यांनी चोरीदरम्यान पूर्ण खबरदारी घेतल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे.बँकेत प्रवेश करताच त्यांनी सर्वप्रथम सीसीटीव्ही कॅमेरे बंद केले तसेच संशयास्पद हालचाली रेकॉर्ड झालेला डीव्हीआर सोबत नेला आहे.हाताचे ठसे उमटू नयेत यासाठी हॅडग्लोव्हजचा वापर केल्याचेही निदर्शनास आले आहे.विशेष म्हणजेच याच बँकेत सुमारे वर्षभरापूर्वी चोरीचा अयशस्वी प्रयत्न झाला होता.तरीही सुरक्षेतील त्रुटी कायम होत्या का असा सवाल उपस्थित होत आहे.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *