zp election news : जि.प., पं.स.साठी 5 रोजीच मतदान

SHARE:

zp election news : जि.प., पं.स.साठी 5 रोजीच मतदान : कर्नाटकातील चिंचणी येथील मायाक्का देवीच्या यात्रेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समितींचे मतदान दोन दिवस पुढे ढकलावे, अशी मागणी करण्यात आली होती. परंतु 10 फेबु्रवारीपासून बारावीची परीक्षा सुरु होत आहे. त्यामुळे दि. 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळली आहे. त्यामुळे निश्चित केलेल्या वेळापत्रकानुसारच दि. 5 फेेब्रुवारीला मतदान होईल. तर दि. 7 फेेब्रुवारीला रोजी निकाल लागणार आहे.

zp election news : जि.प., पं.स.साठी 5 रोजीच मतदान

जिल्हा परिषद आणि पंचायत समित्यांसाठीचे मतदान दि. 5 फेब्रुवारी रोजी होणार आहे. मात्र या दिवस चिंचणी यात्रेचा मुख्य दिवस आहे. धनगर समाजासह बहुजनांचे श्रद्धास्थान असलेल्या मायाक्का देवीची यात्रा महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमेवरील गावांत मोठ्या उत्साहात साजरी केली जाते.

यात्रेसाठी सांगली, सोलापूर, कोल्हापूर आणि सातारा आदी जिल्ह्यांतून लाखो भाविक बैलगाड्या आणि वाहनांनी सहकुटुंब चिंचणीला जातात. यात्रेनंतर ते गावाकडे परततात. यात्रेचा मुख्य विधी 5 फेब्रुवारी रोजी असून या दिवशी लाखो मतदार गावाबाहेर जाण्याची शक्यता आहे. त्याच दिवशी मतदान झाल्यास टक्केवारी घटण्याची शक्यता आहे.

भाविक दोन दिवसांनी म्हणजे 7 फेब्रुवारीपर्यंत गावाकडे परततात, त्यामुळे मतदान किमान दोन दिवस पुढे ढकलण्याची मागणी ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे आणि जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. त्यानुसार आयोगाने जिल्हाधिकार्‍यांकडून अहवाल मागविला होता.

तीन दिवस उशिरा म्हणजे 8 फेब्रुवारी रोजी मतदान घेण्याबाबत विचारणा केली होती. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी सर्व तालुक्यांचे निवडणूक निर्णय अधिकारी व सहायक निर्णय अधिकार्‍यांकडून अहवाल मागविला होता. सर्वांचे अहवाल आयोगाला पाठविण्यात आले आहेत.

बारावीची परीक्षा दि. 10 फेबु्रवारीपासून सुरू होणार आहे. या कारणांमुळे दि. 8 फेबु्रवारी रोजी परीक्षा केंद्र ताब्यात देणे अनिवार्य आहे. त्यामुळे दोन दिवस मतदान पुढे ढकलण्याची मागणी अमान्य करण्यात आली आहे. तसे पत्रही राज्य निवडणूक आयोगाचे उपसचिव के. सूर्यकृष्णमूर्ती यांनी काढले आहे.

त्यामुळे आता ठरलेल्या वेळापत्रकानुसार गुरुवार (दि. 5 फेब्रुवारी) रोजी मतदान आणि शनिवार (दि. 7 फेब्रुवारी) रोजी मतमोजणी होणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *