bhose news : भोसेत काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ : भोसे जिल्हा परिषद आणि भोसे व सोनी पंचायत समिती निवडणुकीतील काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवारांचा रविवारी सकाळी खासदार विशाल पाटील आणि काँग्रेसचे तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे यांच्या उपस्थितीत प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला या कार्यक्रमाला भोसे जिल्हा परिषद गटातील सर्व गावातील मतदारांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती
bhose news : भोसेत काँग्रेस उमेदवारांचा प्रचाराचा शुभारंभ
जिल्हा परिषद चे उमेदवार दिनकर पाटील आणि भोसे पंचायत समितीचे उमेदवार महावीर बस्तवडे व सोनी पंचायत समितीचे उमेदवार गजानन माळी यांच्या प्रचाराचा नारळ हनुमान मंदिर येथे फोडण्यात आला यावेळी भोसे सोनी करोली कळंबी सिद्धेवाडी ताणंग कांचनपूर सांबरवाडी मानमोडी आधी गावातील ग्रामपंचायत सहकारी संस्था आणि महाविकास आघाडीतील सर्वच पक्षाच्या पदाधिकार्यांनी हजेरी लावली होती
प्रचार शुभारंभ नंतर बोलताना खासदार विशाल पाटील यांनी मिरज तालुक्यातील जिल्हा परिषदेसह सर्व पंचायत समिती मतदार संघात महाविकास आघाडीने तगडे आणि लोकांच्या मिळून मिसळून काम करणारे उमेदवार दिले आहेत उमेदवारी देताना अनेक तडजोडी करावा लागल्या पण महाविकास आघाडीचे दिलेले उमेदवार पाहता या तालुक्यातील सर्व मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा माझा विश्वास आहे
मतदारांनी मतदान करताना गेल्या दहा वर्षात हा तालुका विकासापासून कोणी वंचित ठेवला आहे त्याचबरोबर जातीपातीचे राजकारण कोण करत आहे हे पाहूनच काँग्रेस उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहावे भोसे गटातून मला मिळालेले प्रचंड मताधिके हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या उमेदवारांच्या पदरात टाकावे असे आव्हानही खासदार विशाल पाटील यांनी केले
यावेळी दिनकर पाटील महावीर बस्तवडे आणि गजानन माळी यांनी मनोगत व्यक्त करताना पुढील पाच वर्ष काम करण्याची संधी देण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमास वसंत दादा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन बाळासाहेब पाटील सांबरवाडी चे सरपंच सतीश जाधव उपसरपंच श्रीकांत जाधव रामचंद्र मोरे संजय जाधव हरिदास वटकर तानंग चे सरपंच दगडू मोरे सागर कांबळे करोली चे संजय पाटील सुरेश पाटील सांबरवाडी चे महादेव काटकर भरत काटकर मानमोडीचे सुरेश गायकवाड कांचनपूरचे गुरुनाथ देशमुख आदीसह भोसे सोनी सिद्धेवाडी पाट गाव आधी गावातील मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते .
यामध्ये महिला मतदारांची संख्या ही लक्षदीय होती प्रचार शुभारंभ नंतर खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते काँग्रेस पक्षाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











