bhose news : भोसेत भाजपाच्या उमेदवारांच्या सोमवारी प्रचार शुभारंभ : भोसेत भाजपाच्या उमेदवारांच्या सोमवारी प्रचार शुभारंभ संपूर्ण मिरज तालुक्याचे लक्ष लागून राहिलेल्या भोसे जिल्हा परिषद गटात आणि भोसे व सोनी पंचायत समिती गणात आता निवडणुकीचे रणशिंग फुंकले जाणार आहे. सोमवारी सकाळी भोसे येथील पवित्र हनुमान मंदिरात भाजपाच्या उमेदवारांच्या प्रचाराचा भव्य शुभारंभ होणार असून, हा सोहळा आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे.
bhose news : भोसेत भाजपाच्या उमेदवारांच्या सोमवारी प्रचार शुभारंभ
या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मतदारसंघातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे भावनिक आवाहन जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आशिष जाधव यांनी केले आहे.
भोसे जिल्हा परिषद गटातून आशिष जाधव, भोसे पंचायत समिती गणातून मनोज पाटील आणि सोनी पंचायत समिती गणातून राजेंद्र माळी यांना उमेदवारी देत भाजपाने या मतदारसंघात एकाचवेळी आक्रमक खेळी केली आहे. या मातब्बर उमेदवारांच्या घोषणेमुळेच प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या पायाखालची वाळू सरकली असून, राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असल्याचे चित्र दिसू लागले आहे.
काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळख असलेल्या या मतदारसंघात आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या प्रभावी नेतृत्वामुळे आधीच राजकीय हालचालींना सुरुंग लागला आहे. आता आशिष जाधव, मनोज पाटील आणि राजेंद्र माळी यांच्यासारख्या ताकदवान आणि जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना मैदानात उतरवून भाजपाने स्पष्टपणे आघाडी घेतल्याची भावना जनतेत निर्माण झाली आहे.
सोमवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हनुमान मंदिरात प्रचाराचा शुभारंभ झाल्यानंतर, गावातील प्रमुख रस्त्यांवरून भव्य पदयात्रा काढण्यात येणार असून, गांधी चौक येथे जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या सभेतून भाजपाचा विकासाचा संकल्प, जनतेशी केलेली बांधिलकी आणि पुढील पाच वर्षांचा स्पष्ट रोडमॅप मांडला जाणार आहे.
या प्रचार समारंभाला मतदारसंघातील भाजपाप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून, आम्हाला पुढील पाच वर्षे जनसेवेची संधी द्यावी, असे भावनिक आणि विश्वासपूर्ण आवाहन आशिष जाधव, मनोज पाटील आणि राजेंद्र माळी यांनी केले आहे. भोसे मतदारसंघात आता बदलाची चाहूल लागली असून, येणारी लढत अधिकच रंगतदार होणार, हे मात्र नक्की.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











