zp news : कवठेपिरानला 72, समडोळी 72.32 तर कसबे डिग्रज 64. 05 टक्के मतदान

SHARE:

zp news : कवठेपिरानला 72, समडोळी 72.32 तर कसबे डिग्रज 64. 05 टक्के मतदान : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीसाठी शनिवारी मतदान पार पडले. कवठेपिरान, समडोळी आणि कसबे डिग्रज गटामध्ये कार्यकर्ते आणि उमेदवारांत जोरदार चुरस दिसून आली. कवठेपिरान गटात 72.66 टक्के तर समडोळी जिल्हा परिषदे गटासाठी 72.23 टक्के मतदान कसबे डिग्रज गटत 64.05 टक्के मतदान झाले. मतदानानंतर सर्वच उमेदवारांनी विजय आपलाच होईल, असा विश्वास व्यक्त केला.

zp news : कवठेपिरानला 72, समडोळी 72.32 तर कसबे डिग्रज 64. 05 टक्के मतदान

मिरज पश्चिम मागात चुरशीने 72 टक्के मतदान

कवठेपिरान जिल्हा परिषदेसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या सुनंदा विश्वास कोळी विरोधात शरद पवार राष्ट्रवादीच्या मीना सचिन पाटील यांच्यात लढत झाली. हरीपूरमध्ये काँग्रेसचे उमेदवार दस्तगीर मुजावर विरुद्ध भाजपचे अरविंद तांबवेकर यांच्यात जोरदार लढत झाली. कसबे डिग्रज मतदार संघात काँग्रेसचे प्रशांत अवधूत विरोधात प्रदीप पाटील यांच्यात लढत झाली.

सकाळी साडेसात वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली. सर्वच मतदारसंघात चुरशीने लढत होत असल्याने उमेदवार, कार्यकर्त्यांकडून मतदारांची काळजी घेत मत अन् मत खेचण्यासाठी रस्सीखेच सुरु होती.

तिन्ही मतदारसंघात मतदारांना केंद्रावर ने-आण करण्याची करण्याची सोय गावागावात करण्यात आली होती. मतदारांसाठी उमेदवार व पक्षांकडून विशेष वाहनांची व्यवस्था करण्यात आली होती. आपले मतदार दुसर्‍या गटाचे कार्यकर्ते नेत असल्याच्या घटना काही ठिकाणी घडल्या. त्यामुळे दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार ताणाताणी झाल्याचे दिसून आले.

काही ठिकाणी नागरिकांचे मतदार केंद्र हे त्यांच्या घरापासून दूर होते. अशा स्थितीत मतदार मतदानापासून वंचित राहू नयेत, यासाठी सकाळपासूनच वाहनांचे येणे-जाणे सुरू होते.

मतदानासाठी दुपारपर्यंत विशेष गर्दी नव्हती, मात्र दुपारनंतर सर्वच ठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या. शेवटपर्यत दोन्ही गटांकडून मतदार आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्यात आले. मतदानाचा टक्का वाढल्याने सर्वच राजकीय पक्षांच्या उमेदवारांनी आम्हीच बाजी मारु, असा विश्वास व्यक्त केला.

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *