kolhapur news : कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा; : कोल्हापूर महापौरपदासाठी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. कोल्हापुरात आज उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकात पाटील यांनी निकम यांच्या नावाची घोषणा केली. कोल्हापुरात कोणत्याही स्थितीत शिवसेना शिंदे गटाचा महापौर झाला पाहिजे यासाठी आमदार राजेश क्षीरसागर यांनी बॅनरबाजी केली होती.
kolhapur news : कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा;
पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा
त्यामुळे महापौरपदावरून चांगलीच रस्सीखेच रंगली होती. मात्र, आता भाजपकडून रुपाराणी निकम यांना संधी देण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ सव्वा वर्षाचा असणार आहे. त्यामुळे पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेवर महायुतीचा झेंडा फडकणार आहे.
6 फेब्रुवारी रोजी निवड केली जाणार
दरम्यान, कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीनंतर पहिल्याच विशेष सर्वसाधारण सभेची नोटीस गुरुवारी नवनिर्वाचित नगरसेवकांना नगरसचिव कार्यालयाकडून देण्यात आली. 6 फेब्रुवारीला सकाळी 11 वाजता विभागीय आयुक्तांचे प्रतिनिधी म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली होणार्या सभेत महापौर व उपमहापौर यांची निवड केली जाणार आहे. नवनिर्वाचित नगरसेवकांमध्येही पदाधिकारी होण्यासाठी मोठी मोर्चेबांधणी सुरू झाली आहे. विभागीय आयुक्तांच्या मंजुरीनंतर महापौर, उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सकाळी 11 वाजता विशेष सर्वसाधारण सभा बोलविण्यात आली आहे.
रुपाराणी निकम या भाजपच्या तिकिटावर विजयी झाल्या आहेत. त्यांनी प्रभाग क्रमांक 18 मधून निवडणूक लढवताना काँग्रेसचे माजी नगरसेवक भुपाल शेटे यांचा पराभव केला होता. भुपाल शेटे यांचा पराभव आमदार सतेज पाटील यांनाही चटका लावणारा होता. रुपाराणी निकम या महाडिक गटाच्या निकटवर्तीय समजल्या जातात. उच्चशिक्षित ही त्यांच्या जमेची बाजू आहे. महापौर भाजपचा झाल्याने उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचा होणार हे जवळपास निश्चित झालं आहे.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.










