ajit pawar news : अजित पवार यांच्या अपघातानंतर अल्पसंख्याक संस्थांना मान्यता, मुख्यमंत्र्यांनाकडून गंभीर दखल

SHARE:

ajit pawar news : अजित पवार यांच्या अपघातानंतर अल्पसंख्याक संस्थांना मान्यता, मुख्यमंत्र्यांनाकडून गंभीर दखल  : उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विमान अपघातात 28 जानेवारी रोजी निधन झाल्यानंतर मंत्रालयातील अल्पसंख्याक विभागातील काही अधिकार्‍यांनी शासकीय दुखवटा असताना अवघ्या काही तासात म्हणजे एका संस्थेला अल्पसंख्याक दर्जा दिला. तर 29 आणि 30 जानेवारी रोजी तब्बल 74 संस्थांनाही हा दर्जा बहाल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची अखेर गंभीर दखल घेवून या निर्णयाला स्थगिती दिली.

ajit pawar news : अजित पवार यांच्या अपघातानंतर अल्पसंख्याक संस्थांना मान्यता, मुख्यमंत्र्यांनाकडून गंभीर दखल

शिवाय संबंधित अधिकार्‍यांना सह्याद्री अतितिगृहात बोलावून चांगलेच फैलावर घेतले. यापूर्वी तत्कालीन अल्पसंख्याक विकास मंत्री दत्तात्रय भरणे आणि माणिकराव कोकाटे यांनी या संस्थांना अल्पसंख्याक दर्जा देण्यास विरोध केला होता. कोकाटे यांनी राजीनामा दिल्यानंतर या खात्याचा भार अजित पवार यांच्याकडे गेला होता. त्यांचाही विरोध होता. परंतु, अजित पवार यांचे निधन झाल्याची संधी पाहून अल्पसंख्याक विभागातील अधिकार्‍यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अंधारात ठेवून मनमानी केली.

अजितदादा यांच्या सकाळी दुःख निधनाची वृत्त आल्या नंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगेच तीन दिवसांचा शासकीय दुखावटा जाहीर केला. त्यानंतर दुपारी बारा वाजल्या नंतर मंत्रालयाला सुट्टी देण्यात आली होती. जवळ जवळ एक वाजल्यानंतर अर्धे मंत्रालय खाली झाले होते. एकीकडे मंत्रालयात दुखाचे सावट असताना, अल्पसंख्याक विभागाच्या काही अधिकार्‍यांनी पहिले प्रमाणपत्र 28 जानेवारी रोजी दुपारी 3 वाजून 9 मिनिटांनी श्री माता कन्यका सेवा संस्थेला दिल्याची नोंद आहे.

यवतमाळ येथील सेवादास महाराज शिक्षण प्रसारक मंडळ यांनाही त्याच दिवशी प्रमाणपत्र देण्यात आले. या दिवशी एकूण सात संस्थांना अल्पसंख्यांक दर्जा देण्यात आल्याचे समजते.
29 आणि 30 जानेवारीला मोठ्या शिक्षण संस्थांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 1 फेब्रुवारी हा रविवार असल्याने कोणतेही प्रमाणपत्र दिले गेले

नाही. मात्र, 2 फेब्रुवारी रोजी पुन्हा अनेक शाळांना अल्पसंख्यांक दर्जा बहाल करण्यात आला. अवघ्या चार दिवसांत 75 संस्थांना मान्यता देण्यात आली. काही संस्थांना मंत्रालयातील कामकाजाची वेळ संपल्यानंतर सायंकाळी 6.45 आणि 6.58 वाजता प्रमाणपत्रे देण्यात आल्याचे समजते.

या 75 संस्थांपैकी 25 शाळा पोदार इंटरनॅशनल स्कूल, सेंट झेवियर्स 5, स्वामी शांती प्रकाश आणि देवप्रकाश संस्थांच्या प्रत्येकी 4 शाळांनाही प्रमाणपत्रे देण्यात आली आहेत.
————–
अल्पसंख्याक दर्जा कशासाठी घेतात?
– या शाळात शिक्षकांसाठी टीईटी बंधनकारक नसते
– अल्पसंख्यांक शाळांवर आरटीई आणि माहीती अधिकार कायदा लागू होत नाही. यामुळे 25 टक्के गरीब विद्यार्थ्यांच्या प्रवेशाचे बंधन राहत नाही.
– शिक्षकांना पदोन्नतीत काही सवलती.
– कोट्यवधी रुपयांच्या देणग्या आणि अनुदान स्वीकारण्याची मुभा.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *