dudhgaon crime news : दुधगाव मध्ये किरकोळ कारणातून एकास लोखंडी रॉडने मारहाण :

SHARE:

dudhgaon crime news : दुधगाव मध्ये किरकोळ कारणातून एकास लोखंडी रॉडने मारहाण : मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये रस्त्यावरून जाण्याच्या कारणातून एका तरुणास लोखंडी रॉडने बेदम मारहाण केली. यावेळी भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या पत्नीला लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना घडली. सदर हाणामारीची घटना हि रविवार दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ आणि सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास घडली.

dudhgaon crime news : दुधगाव मध्ये किरकोळ कारणातून एकास लोखंडी रॉडने मारहाण :

पती पत्नी दोघेही जखमी : पाच जणांवर गुन्हा दाखल.

या हल्ल्यात सचिन रावण आवळे (रा. दुधगाव) हे जखमी झाले आहेत. या प्रकरणी लक्ष्मी सचिन आवळे (वय 25 रा. दुधगाव) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित गुंड्या उर्फ सर्जेराव देवप्पा आवळे, अमित चंद्रकांत आवळे, विजया चंद्रकांत आवळे, संगीता सर्जेराव आवळे आणि शुभांगी अमित आवळे (सर्व रा. दुधगाव) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, लक्ष्मी आवळे या आपल्या कुटुंबियांसह मिरज तालुक्यातील दुधगाव मध्ये राहतात. लक्ष्मी आवळे यांचे पती सचिन आवळे हे रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून निघाले होते. यावेळी संशयित अमित आवळे यांनी तू सारखा सारखा या रस्त्यावरून का जातोस, तुझ्या बापाचा रस्ता आहे का असे म्हणत शिवीगाळ करून गाडीवरून खाली पाडले.

यावेळी लक्ष्मी त्यांना उचलण्यासाठी गेल्या असता अमित आवळे आणि शुंभांगी आवळे यांनी दोघांना लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली.

सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी यांची चुलत सासू विजया आवळे व चुलत जाऊ विजया आवळे, संगीता आवळे या शिवीगाळ करत असतां सचिन त्यांना समजावून सांगत होते. यावेळी गुंड्या उर्फ सर्जेराव आवळे यांनी लोखंडी रॉडने बेदम मारहाण करत जखमी केले.

 

यावेळी भांडणे सोडवण्यासाठी लक्ष्मी गेल्या असता त्यांनाही बेदम मारहाण करण्यात आली. घडलेल्या या घटनेनंतर लक्ष्मी आवळे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी संशयित पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *