savalwadi crime news : सावळवाडीत सामायिक शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

SHARE:

savalwadi crime news : सावळवाडीत सामायिक शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी : सामाईक शेतीमधील ऊस तोडीच्या कारणावरुन मारहाण करण्यात आल्याची घटना मिरज तालुक्यातील सावळवाडीत घडली. सदरची घटना हि सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी सकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल करण्यात आल्या आहेत. त्यानुसार पोलिसांनी चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.

savalwadi crime news : सावळवाडीत सामायिक शेतीच्या वादातून दोन गटात हाणामारी

आदिनाथ भरमा आवटी (वय 55, रा. सावळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सावळवाडीतील फिर्यादी आदिनाथ आवटी यांना संशयित अनिता शांतिनाथ आवटी (वय 47, रा. सावळवाडी) यांनी उसाच्या दांडक्याने मारहाण केली. सामाईक शेतीमधील ऊस तोडीच्या कारणावरुन त्यांच्यात वाद झाला होता.

मारहाणीचा जाब विचारल्यावर संशयित अनिता यांनी, तुझ्यावर खोटा गुन्हा दाखल करुन तुला जेलची हवा दाखविते अशी धमकी दिल्याचेही फिर्यादीत नमूद केले आहे. अनिता शांतिनाथ आवटी (रा. सावळवाडी) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, संशयित आदिनाथ आवटी यांनी सामाईक शेतीमधील ऊस तोडीच्या कारणावरुन फिर्यादी अनिता आवटी यांना उसाच्या दांडक्याने मारहाण केली.

संशयित आदित्य आदिनाथ आवटी याने अनिता यांना लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच संशयित वैशाली आदिनाथ आवटी हिने शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पोलिसांनी दोन्ही बाजूकडील फिर्यादी नोंदवून घेवून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *