kasbe digraj news : कसबेडिग्रजजवळ भरधाव दुचाकीची एसटी बसला पाठीमागून जोराची धडक 

SHARE:

kasbe digraj news : कसबेडिग्रजजवळ भरधाव दुचाकीची एसटी बसला पाठीमागून जोराची धडक : सांगली : पेठ ते सांगली या राष्ट्रीय महामार्गावरील कसबेडिग्रज गावाच्या कमानीजवळ पुणे ते कुरुंदवाड निघालेल्या एसटी बसला भरधाव दुचाकीने पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील यासिन राजू मुजावर (वय 25 रा. उदगाव) हा गंभीर जखमी झाला आहे.

kasbe digraj news : कसबेडिग्रजजवळ भरधाव दुचाकीची एसटी बसला पाठीमागून जोराची धडक 

सदरचा अपघात हा सोमवार दि. 16 फेब्रुवारी रोजी दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास झाला. या प्रकरणी बस चालक प्रल्हाद विश्वनाथ कोयचाडे (वय 39 रा. कुरुंदवाड) यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून दुचाकी चालक राहुल सर्जेराव पडियार (वय 28 रा. उदगाव) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, राज्य परिवहन महामंडळाचे चालक प्रल्हाद कोयचाडे हे त्यांच्या ताब्यातील एसटी बस (क्र. एमएच 14 एमएच 1930) हि घेऊन पुणे स्टेशन ते कुरुंदवाड अशी घेऊन येत होते. सदरची बस हि सोमवारी दुपारी पाऊणे चार वाजण्याच्या सुमारास कसबेडिग्रज गावच्या कमानीपासून थोडी पुढे आली.

यावेळी पाठीमागून संशयित दुचाकीस्वार राहुल पडियार हा त्याच्या ताब्यातील मोटारसायकल (क्र. एमएच 51 ई 4711) हि भरधांव वेगात चालवून एसटीच्या पाठीमागील चाकाच्या बाजूस जोरात धडकली. या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेला यासिन मुजावर हा गंभीर जखमी झाला.

अपघातानंतर जखमीला उपचारासाठी तातडीने दाखल करण्यात आले. या प्रकरणी बस चालक प्रल्हाद कोयचाडे यांनी सांगली ग्रामीण पोलिसात फिर्याद दिली. त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी दुचाकीस्वारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *