sarpanch nivad vishes : जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायतमध्ये सरपंच प्रशासक

SHARE:

sarpanch nivad vishes : जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायतमध्ये सरपंच प्रशासक : जिल्ह्यातील 152 ग्रामपंचायतींची विद्यमान सरपंच, सदस्यांचा कार्यकाल संपला आहे. ग्रामविकास विभागाने एक महत्त्वपूर्ण अधिसूचना काढून मुदत संपणार्‍या ग्रामपंचायतीवर प्रशासक म्हणून विद्यमान सरपंचच ’प्रशासक’ म्हणून नियुक्त करण्याचा आदेश दिले होते, त्यानुसार जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक व प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

sarpanch nivad vishes : जिल्ह्यातील 145 ग्रामपंचायतमध्ये सरपंच प्रशासक

मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांकडून प्रशासक, प्रशासकीय समित्या नियुक्त

त्याबाबतचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांनी काढले आहेत. दरम्यान सात ग्रामपंचायतमध्ये प्रशासक कोण याबाबत निर्णय झालेला नाही,

सरकारने जानेवारी महिन्यात शासनाने मुदत संपणान्या ग्रामपंचायतींवर पंचायत समितीच्या विस्तार अधिकार्‍यांची प्रशासक म्हणून नियुक्ती करण्याचे आदेश दिले होते. मात्र, राज्यातील ग्रामपंचायतींची संख्या आणि त्या तुलनेत उपलब्ध असलेल्या विस्तार अधिकार्‍यांची संख्या मर्यादित होती. यामुळे प्रशासकीय अडचणी निर्माण होण्याची शक्यता होती. बाहेरील अधिकार्‍यांना स्थानिक प्रश्नांची माहिती नसल्याने विकासकामे ठप्प होण्याच्या तक्रारी आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, गावच्या कामकाजात सातत्य राहावे आणि विकासकामांना गती मिळावी, यासाठी सरकारने सरपंचच प्रशासक म्हणून नियुक्त करण्याचा निर्णय घेतला आहे

प्रशासक नियुक्तीबाबत शासनाने निर्णय जारी केला होता. त्यानुसार जिल्हा परिषदेने कार्यवाही केली आहे. जिल्ह्यातील मुदत संपलेल्या 145 ग्रामपंचायतींवर अखेर प्रशासक व प्रशासकीय समित्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. फेब्रुवारी महिन्यात मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासक नियुक्ती करण्यात येत आहे. विद्यमान सरपंच हेच प्रशासक असतील. तर विद्यमान उपसरपंच व सदस्य यांची प्रशासकीय समितीही कार्यरत असेल. या सर्वांचा कार्यकाल कमाल सहा महिन्यांचा असेल. त्यापूर्वी निवडणुका होऊन लोकनियुक्त सदस्य सत्तेत आल्यास प्रशासक व प्रशासकीय समितीचे अस्तित्व संपुष्टात येईल.

दरम्यान, मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींची संख्या 152 आहे. मात्र प्रशासक नियुक्ती 145 गावांत करण्यात आली आहे. मिरज तालुक्यात एरंडोली व अंकली ग्रामपंचायतींतील सदस्यांची मुदत 8 फेब्रुवारी रोजी संपली आहे. तशी माहिती जिल्हाधिकारी कार्यालयास पाठवूनही प्रशासक नियुक्तीचा आदेश झालेला नाही. त्यामुळे आता येथील कामकाज कोण पाहणार? की ग्रामपंचायत अधिकारीच सर्वेसर्वा असणार? हा प्रश्न निर्माण झाला आहे.

ग्रामपंचायतींची तालुकानिहाय संख्या
खानापूर – 12
कवठेमहांकाळ – 11
शिराळा – 2
वाळवा – 2
आटपाडी – 10
कडेगाव – 8
मिरज – 20
तासगाव – 37
जत – 29
पलूस – 14

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *