budjet news : शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर

SHARE:

budjet news : शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर : महायुती सरकार सत्तेत आल्यापासून कर्जमाफीच्या निर्णयाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकर्‍यांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्याचे नवनिर्वाचित अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी आगामी आर्थिक वर्षासाठीचा अर्थसंकल्प मांडताना कर्जमाफीच्या निर्णयाची घोषणा केली.

budjet news : शेतकर्‍यांना दोन लाखापर्यंत कर्जमाफी जाहीर

देवेंद्र फडणवीसांच्या अर्थसंकल्पातील सर्वात मोठी घोषणा

आम्ही राज्यातील शेतकर्‍यांसाठी कर्जमाफी योजना राबवण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यासाठी समिती गठीत केली आहे. 30 सप्टेंबर 2025 रोजी पीक कर्ज थकित असलेल्या शेतकर्‍यांना 2 लाख रुपयांपर्यंत पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करत आहे, अशी घोषणा अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच जे शेतकरी नियमित कर्जफेड करतात त्यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन पर लाभ दिला जाणार असल्याचेही फडणवीस यांनी जाहीर केले.

कर्जमाफी आणि प्रोत्साहनपर लाभ देण्यासोबत राज्यातील बँकिग यंत्रणा सक्षम असावी, यासाठी समितीच्या शिफारसीनुसार निर्णय घेण्यात येईल. शेतकरी वारंवार कर्जबाजारी न होता त्याला कायमचा कर्जमुक्त करण्याचा सरकारचा संकल्प असून समितीच्या शिफारसीनुसार दीर्घकालीन उपाययोजन केल्या जात आहेत, असेही यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

महायुती सरकार सत्तेत आल्यापासून विरोधकांकडून महायुती सरकारला शेतकरी कर्जमाफीच्या योजनेचे काय झाले, असा जाब विचारत होते. निवडणूक झाल्यानंतर सरकार शेतकरी कर्जमाफीचे आश्वासन विसरले, अशी टीका विरोधकांकडून केली जात होती. मात्र, आज देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा करुन विरोधकांच्या या टीकेतील हवा काढून घेतली आहे. मात्र, ही कर्जमाफी नेमकी कोणाला मिळणार, याचे निकष आणि तपशील अद्याप समोर येणे बाकी आहे.

खालील शेतकरी पात्र ठरणार

– दोन लाख रुपयांपर्यंतची थकबाकी असलेले शेतकरी.
– ज्यांचं पीककर्ज थकलेलं आहे असे शेतकरीच पात्र असतील.
– 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज माफ होणार.
– नियमित कर्जपरतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन लाभ.

बजेटमधील शेतीसाठीचे महत्त्वाचे मुद्दे

शेतकर्‍यांचं दोन लाखांपर्यंतचं पीककर्ज माफ
नियमित कर्जपरतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना 50 हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहन
गोपीनाथ मुंडे अपघात योजनेत शेतमजूरांचा सहभाग करणार.
पाणंद रस्त्यांना मान्यता दिली आहे.
30 लाखांहून अधिक शेतकर्‍यांना हवामान, बाजारभाव माहिती दिली जात आहे.
चारही कृषी विद्यापीठात एआयजी मदत
अ‍ॅग्रीस्टॅक योजना राबविण्यात येत आहे.
1 कोटी 31 लाख फार्मर आयडी
चार वर्षांत भांडवली गुंतवणूक वाढवून पायाभूत सुविधा निर्माण केल्या जातील.
आगामी दोन वर्षांत महाराष्ट्र नैसर्गिक शेती अभियानाची सुरुवात.
गोपीनाथ मुंडे मंडळात आता शेतमजुरांचा ही समावेश करणार
महिला गोपालक, शेळी पालकांसाठी विशेष योजना राबविण्यात येईल.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *