ncp sangli news : तीन हेलपाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीची गटनोंदणी: अजितदादा राष्ट्रवादी काँगे्रसकडून राजेश्वरी रणधीर नाईक यांची गटनेतेपदी निवड झाली आहे. जिल्हाधिकार्यांकडे गटनोंदणी करण्यासाठी सादर करण्यात आलेल्या अर्जातील नावामध्ये त्रुटी काढण्यात आल्या होत्या. दोनवेळा त्रुटी काढल्याने राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून जिल्हा प्रशासनावर टीकेचा बाण सोडला होता. त्यानंतर तिसर्यांदा सोमवारी गट नोंदणीसाठी राष्ट्रवादीच्या सदस्यांसह जिल्ह्यातील नेतेही दाखल झाले होते. तीन हेलपाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीची गटनोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली.
ncp sangli news : तीन हेलपाट्यानंतर अखेर राष्ट्रवादीची गटनोंदणी
राजेश्वरी नाईक गटनेता, जिल्ह्यातील नेत्यांची उपस्थिती
येथील जिल्हाधिकारी कार्यालयात राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषदेतील गटनेतेपदी राजेश्वरी नाईक यांच्या नावाची नोंदणी जिल्हाधिकार्यांकडे करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील, माजी खासदार संजयकाका पाटील, माजी मंत्री शिवाजीराव नाईक, माजी आ.अजितराव घोरपडे, माजी आ. विलासराव जगताप, माजी सभापती तम्मणगौडा रवि-पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे नूतन जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सदस्य दोन वेळा गट नोंदणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेले होते. पहिल्यावेळी नावात काही बदल असल्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगितले. त्यामुळे अर्ज बदलून आणण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यामुळे गट नोंदणीशिवाय परत फिरावे लागले होते.
त्यानंतर शुक्रवारी (दि. 6) रोजी गटनेत्या राजेश्वरी नाईक आणि सर्व सदस्य जिल्हाधिकार्यांकडे गेले होते. दुपारी एक वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात सदस्य आले होते. मात्र त्यांना सायंकाळी सहा वाजता जिल्हाधिकार्यांनी भेट दिली. दुरुस्त करुन नेलेल्या अर्जाची तपासणी करताना सावित्री रवि-पाटील आणि अन्य एका नावामध्ये त्रुटी असल्याचे जिल्हाधिकार्यांरी पुन्हा निदर्शनास आणले. त्यांनी अर्ज पुन्हा बदलून आणण्याच्या सूचना केल्या.
गत आठवड्यात गट नोंदणीसाठी प्रयत्न सुरु होते. मात्र नोंदणी करण्यास जिल्हा प्रशासनाकडून टाळाटाळ केली गेली. जिल्हाधिकार्यांवर दबाव आहे. त्यामुळे ते टाळाटाळ करीत असल्याचा आरोप माजी आ. विलासराव जगताप यांनी केला होता. या पार्श्वभूमीवर सोमवारी गटनोंदणी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या जिल्हा परिषद सदयांसह जिल्ह्यातील नेतेही उपस्थित राहिले. सर्व जण जिल्हाधिकार्यांना भेटले. त्यानंतर जिल्हा प्रशासनाकडून गट नोंदणीची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











