sangli zp news : सांगलीत भाजपचा डाव फसणार

SHARE:

sangli zp news : सांगलीत भाजपचा डाव फसणार : सत्ता स्थापनेसाठी 30 सदस्यांचे संख्याबळ आवश्यक आहे. महायुतीकडे संख्येने 31 सदस्य असले तरी राजकीय समीकरणे क्षणाक्षणाला बदलत असल्याने परिस्थिती अजूनही अनिश्चित आहे. दोन्ही राष्ट्रवादी गट आणि काँग्रेस एकत्र आले तर भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागू शकते.

sangli zp news : सांगलीत भाजपचा डाव फसणार

यामुळे सांगली जिल्हा परिषदेतील सत्तासंघर्ष आता केवळ आकड्यांचा खेळ राहिलेला नाही, तर तो प्रतिष्ठेचा आणि राजकीय भवितव्याचा निर्णायक सामना बनला आहे. 18 मार्चचा दिवस जवळ येत असताना जिल्ह्याच्या राजकारणातील हा थरार कोणत्या दिशेने वळण घेणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे

राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यातील संघर्ष आता केवळ राजकीय स्पर्धा न राहता प्रतिष्ठेची लढाई बनला आहे. सर्वाधिक 18 जागा जिंकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी भाजपने आखलेली रणनीती यशस्वी होईल का, याबाबत आता शंका निर्माण होत आहे.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडिओ पहा

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *