miraj panchyat samiti news : मिरज पंचायत समितीत भाजपचा गेम होणार

SHARE:

miraj panchyat samiti news : मिरज पंचायत समितीत भाजपचा गेम होणार : मिरजच्या राजकीय पटावर सध्या सत्ता स्थापनेच्या घडामोडींनी चांगलाच रंग भरला आहे. पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आला असून महाविकास आघाडीने एकजुटीची भक्कम घडी बसवली आहे. कोणत्याही परिस्थितीत भाजपला पराभवाची चव चाखवायचीच, असा निर्धार करत विरोधी पक्षांनी आपली रणनीती आखली असल्याचे चित्र दिसत आहे.

miraj panchyat samiti news : मिरज पंचायत समितीत भाजपचा गेम होणार

मिरज पंचायत समितीत एकूण 22 जागा आहेत. त्यापैकी 10 जागा भाजपच्या ताब्यात आहेत. तर उर्वरित जागांमध्ये काँग्रेसकडे 3, राष्ट्रवादी (शरदचंद्र पवार) गटाकडे 4, राष्ट्रवादी (अजित पवार) गटाकडे 3 आणि शिवसेना शिंदे गटाकडे काही जागा आहेत. या सर्व समीकरणांच्या पार्श्वभूमीवर सत्ता स्थापनेची गणिते वेगाने बदलताना दिसत आहेत.

10 मार्च रोजी मिरज पंचायत समितीत सभापती आणि उपसभापती पदाची निवड होणार आहे. या निवडीपूर्वीच महाविकास आघाडीने राजकीय डावपेचांची अचूक जुळवाजुळव केली असल्याची चर्चा रंगली आहे. त्यानुसार टाकळी पंचायत समिती गणातून राष्ट्रवादी शरद पवार गटातून निवडून आलेल्या रिद्धी मुजावर यांना सभापतीपद देण्याचा विचार पुढे आला आहे. तर बुधगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेना शिंदे गटाचे पांडुरंग इंगळे यांना उपसभापतीपद देण्याचा फॉर्म्युला जवळपास निश्चित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

संपूर्ण माहिती पाहण्यासाठी खालील व्हिडीओ पहा

 

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *