kolhapur news : कोल्हापुरातील पाटगावच्या बेपत्ता माजी सरपंचाचा दोन महिन्यांपासून थांगपत्ता लागेना

SHARE:

kolhapur news : कोल्हापुरातील पाटगावच्या बेपत्ता माजी सरपंचाचा दोन महिन्यांपासून थांगपत्ता लागेना : पाटगाव (ता.भुदरगड) येथील माजी सरपंच महेश दिनकर पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. पाटगाव गावालगत कुलकर्णी नावाच्या शेताजवळ त्यांचे वाहन आढळले होते. याचठिकाणी काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही अस्थी सापडल्याने खळबळ उडाली होती. याप्रकरणी तपासात पोलिसांना अद्याप यश आले नाही. त्यामुळे बीडमधील मस्साजोग प्रकरणाची पुनरावृत्ती झाली का अशी भीती व्यक्त होत आहे.

kolhapur news : कोल्हापुरातील पाटगावच्या बेपत्ता माजी सरपंचाचा दोन महिन्यांपासून थांगपत्ता लागेना

माजी सरपंच महेश पिळणकर गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता आहेत. भुदरगड पोलीस व स्थानिक नागरिक त्यांचा कसून शोध घेत होते. दरम्यानच, पाटगाव गावालगत शेतात त्यांचे वाहन आढळले होते. तर काही अंतरावर जळालेल्या अवस्थेत काही अस्थी आढळल्या होत्या. या अस्थी अधिक तपासासाठी फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आल्या. मात्र याचाही अहवाल अद्याप मिळाला नाही.

दरम्यान, याबाबत लोकशाही व संविधान हक्क संरक्षण समिती आणि पिळणकर कुटुंबीयांनी सोमवारी (दि. 9) दसरा चौकात निदर्शने करून पोलिस अधीक्षकांना निवेदन दिले. या प्रकरणात पोलिसांनी तपास गतिमान करावा असी विनंती त्यांनी केली आहे.
पिळणकर यांच्या शोधासाठी एसआयटी

पोलिसांनी देखील या तपासासाठी विशेष पथक स्थापन करून लवकरात लवकर या प्रकरणाचा छडा लावण्याचं आश्वासन जिल्हा पोलीस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी पिळणकर यांच्या कुटुंबाला दिलं. यावेळी पिळणकर कुटुंबियांनी पुन्हा फॉरेन्सिक तपासणी करण्याची मागणी पोलिसांकडे केली.

Rajkiya Live
Author: Rajkiya Live

दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *