miraj panchyat samiti news : मिरजेत भाजपचे दहा सदस्य असूनही सत्तेपासून दूर : मिरज तालुक्यात भाजपने पंचायत समिती निवडणुकीत भाजपचे दहा सदस्य निवडून आले होते. मिरज पंचायत समितीवर भाजपची सत्ता येणार असे स्पष्ट होते. परंतु नाट्यमय राजकीय घडामोडी घडत मिरज पंचायत समितीवर सर्वांत लहान वयाच्या काँग्रेसच्या तन्वी अशोक कमलेकर यांची निवड झाली. तर युतीमधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेच्या सदस्या ललिता शेजुळ या उपसभापती निवड झाली. भाजपचे सर्वात जास्त सदस्य येवूनही सत्तेबाहेर राहिल्याने भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
miraj panchyat samiti news : मिरजेत भाजपचे दहा सदस्य असूनही सत्तेपासून दूर
पंचायत समितीत काँग्रेसच्या तन्वी कमलेकर सभापती तर उपसभापती शिवसेनेच्या ललिता शेजुळ
सभापती निवडीवेळी काँग्रेसतर्फे तन्वी कमलेकर व भाजपतर्फे राणी सचिन भोरे यांनी अर्ज दाखल केला होता. तर उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजुळ, भाजपतर्फे अमृता विजय गावडे, पांडुरंग पाटील यांनी अर्ज भरला होता. अमृता गावडे यांनी आपला अर्ज माघार घेतला.
पंचायत समितीच्या वसंतदादा पाटील सभागृहात काँग्रेसच्या तन्वी कमलेकर यांना सभापतीपदी निवडीसाठी काँग्रेस तीन, राष्ट्रवादी शरद पवार गट चार, शिवसेना एक, राष्ट्रवादी अजित पवार गट तीन सदस्यांनी हात उंचावून मतदान केले. उपसभापतीपदी शिवसेनेच्या ललिता शेजाळ यांनाही सर्वांनी हात उंचावून मतदान केले. सभापतीपदी काँग्रेसच्या तन्वी कमलेकर, उपसभापतीपदी ललिता शेजाळ यांची निवड झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रांताधिकारी उत्तम दिघे होते.
भाजपला पंचायत समितीमध्ये 10 उमेदवार सदस्य निवडून आणून मोठा पक्ष ठरला होता. परंतु सत्तेसाठी 12 ही संख्या महत्वाची होती. मिरज पंचायत समितीवर काँग्रेसचे 3, राष्ट्रवादी शरद पवार गट 4, शिवसेना 2, राष्ट्रवादी अजित पवार गट 3 असे बलाबल पंचायत समितीमध्ये आहे.
सभापती निवडीवेळी युतीमधील घटक पक्ष असलेले शिवसेनेचे पंचायत समितीचे दोन सदस्य भाजपला मदत करतील असे चित्र होते. परंतु नाट्यमय घडामोडीमध्ये शिवसेनेचे दोन सदस्यांपैकी बुधगावचे पांडुरंग कृष्णा इंगळे हे अनुपस्थितीत राहिले. तर शिवसेनेच्या सदस्या ललिता शेजुळ यांनी महाविकास आघाडीच्या बाजूने राहण्याचा पक्षाचा निर्णय मानला. शिवसेनेच्या ललिता शेजुळ यांना उपसभापतीपद देण्यात आले.
शिवसेनेच्या दोन्ही सदस्यांनी महाविकास आघाडीला मदत केली. त्यामुळे पंचायत समितीवर भाजपचे दहा सदस्य असूनही पंचायत समितीमध्ये भाजप सत्तेत नसल्याने भाजपला मोठा धक्का बसला आहे. या घडामोडीमध्ये जिल्हा परिषद जिल्हा परिषदेमध्ये असाच फॉर्मुला असणार याची जुणूक दिसून आली आहे.
मिरज पंचायत समितीवर भाजपच्या सत्तेसाठी शिवसेनेचे सदस्य भाजपसोबत राहणार असे चित्र असताना शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य पांडुरंग इंगळे हे रात्रीपासूनच नॉटरिचेबल राहिले. त्यामुळे भाजपची धावाधाव सुरू झाली. तर शिवसेनेच्या दुसर्या सदस्य ललिता शेजुळ या महाविकास आघाडीसोबत जाणार हे स्पष्ट झाले.
पंचायत समितीवर महाविकास आघाडीची सत्ता आणण्यासाठी खा. विशाल पाटील, अजितराव घोरपडे, राष्ट्रवादीचे मनोजबाबा शिंदे, शिवसेनेचे मोहन वनखंडे यांची बैठक झाली. या बैठकीत शिवसेनेने महाविकास आघाडीच्या बाजूने मतदान करायचं आणि शिवसेनेला उपसभापतीपद देण्याचे ठरले. शिवसेनेचे एक सदस्य गैरहजार राहिला आणि एक सदस्य महाविकास आघाडीच्या बाजूने राहिला. भाजपचे दहा आणि महाविकास आघाडीचे अकरा सदस्य झाले आणि महाविकास आघाडीचा सभापती विराजमान झाला. नूतन सभापती तन्वी कमलेकर या उच्चशिक्षित असून, सर्वात लहान वयातच त्यांना सभापती बनण्याचा मान मिळाला आहे.
खा. विशाल पाटील म्हणाले, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक ही पक्षाच्यावर नाही तर विचारावर लढली आहे. विचारावर लढत असताना वसंतदादांपासून पुरोगामी विचारांची जनता आहे. त्यांच्यासाठी चांगला पर्याय म्हणून उमेदवार उभे केले होते. आज सभापती निवड होत असताना काँग्रेस, राष्ट्रवादी, राष्ट्रवादी शरद पवार गट, शिवसेना आहे. ही पुरोगामी विचार आहे. ती अशीच पुढे राहिली आहे.
काँग्रेसची तरूण महिला सभापती देण्याचा मान मिळाला आहे. जयंत पाटील, विश्वजित कदम यांच्यामध्ये चर्चा करून ही मोट बांधली आहे. दोन्ही सभापती, उपसभापती आमच्या विचारांचे झाले आहे. अनेक धमक्या आणि त्रास सहन करून आपल्याच विचाराचे सभापती, उपसभापती झाले.
अजितराव घोरपडे म्हणाले, जिल्ह्यामध्ये भाजपच्या विरोधात वातावरण आहे. त्यामुळे असे अनेक राजकीय चमत्कार घडणार आहेत. त्यामुळे कोणीही धमकी देवू नये असा टोलाही हाणला.
Author: Rajkiya Live
दिनेशकुमार ऐतवडे रा. समडोली ता. मिरज जि. सांगली हे गेल्या 25 वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात आहेत. Bsc झाल्यानंतर शांतीनिकेतन मधून पत्रकारितेची पदवी घेतली. 1999 मध्ये त्यांनी लोकमत मधून आपल्या कामाला सुरुवात केली. त्यानंतर 1 एप्रिल 2000 ते 20 jully 2020 परेंत तरुण भारत च्या सांगली आवृत्ती मध्ये उपसंपादक पदावर काम केले. सध्या ते दैनिक जनप्रवास मध्ये उपसंपादक म्हणून काम करीत आहेत. राजकारण हा त्यांच्या मुख्य विषय आहे. सांगली, कोल्हापूर, आणि हातकणंगले लोकसभा मतदार संघावर त्यांनी भरपूर लिखाण केले आहे.











